कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे:-वजन, किंमत संबंधातील फसवणुकीबाबत ग्राहकांना तक्रार करण्याचे आवाहन.

प्रतिनिधी शफीक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

वजन, किंमत संबंधातील फसवणुकीबाबत ग्राहकांना तक्रार करण्याचे आवाहन.

पुणे, दि. (शफिक शेख):- वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणा-या, पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करणा-या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.
पेट्रोल पंपावर सीएनजी भरत असताना रिक्षाचालक आणि कारचालक यांची अनेकवेळा सीएनजी कमी भरणे, रिडरवर दाखविलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारणे अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहेत. त्यासंदर्भात आमचे प्रतिनिधी शफिक शेख यांनी जिल्हा वैध मापनशास्त्र उपनियंत्रक संजीव कवरे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले की, सीएनजी मोजणीची नियंत्रके ही कॅलिब्रेटेड असतात आणि सहसा त्यामध्ये फसवणूक करता येत नाही तरीही जर नागरिकांना जर शंका असेल तर ते खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून त्याबाबत तक्रार करू शकतात. त्या संबंधित पंपचालकांची चौकशी करून योग्य असल्यास कारवाई केली जाईल.
उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहित मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन करुन न घेणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.
पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास वैध मापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते.
येणा-या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच ९८६९६९१६६६ या व्हॉटस अप क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा वैध मापन शास्त्र उप नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button