पुणे:-पिंपरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकास दोन लाख रूपये लाचप्रकरणी अटक
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पिंपरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षकास
दोन लाख रूपये लाचप्रकरणी अटक
पिंपरी, दि. 2 (शफिक शेख):- गुन्हयात दाखल आरोपीस आरोपी न करण्यासाठी तसेच तो अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच म्हणून मागणी केल्यामुळे पिंपरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रोहित गणेश डोळस यांस लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या भावावर गंभीर गुन्हयाखाली आरोपपत्र दाखल होते. डोळस यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रूपये 2,00,000/- रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी सदर बाबीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे केली असता सदर विभागाने दिनांक 2/12/2022 रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सदर श्री. डोळस यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक 30/12/2022 रोजी अटक करण्यात आली.
या प्रकरणाचे तपास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे चे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले आणि वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सदरची कारवाई मा. पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
शासकीय अधिकारी/कर्मचारी/लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास खालील नमूद क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्री. अमोल तांबे यांनी केले.
हेल्पलाईन क्रमांक 1064
अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे – 02026122134, 02026132802, 02026050423
व्हॉट्सअॅप क्रमांक पुणे – 7875333333
व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई – 9930997700
ईमेल आयडी पुणे – dyspacbpune@mahapolice.gov.in
वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in