कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-सुंदर बस स्थानकात गाजले मेढा व इतर बाकी ठरले”’ ढ ”’.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सुंदर बस स्थानकात गाजले मेढा व इतर बाकी ठरले”’ ढ ”’.

सातारा दि: ग्रामीण भागातील लालपरी ज्या ठिकाणी ये जा करते. अशा बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत परिवहन महामंडळ जागरूक झालेले आहे. बस स्थानक परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानकाने ”’ क ”’ वर्गात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर फलटण, दहिवडी, कराड, वडूज बस स्थानकांचाही सार्थ अभिमान वाटू लागला आहे. स्पर्धेत न चमकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील इतर बस स्थानक ”’ ढ ”’ असल्याचे अधोरेखित झालेले आहे. याचा आता एस.टी. कर्मचारी व प्रवाशांनी निराश न होता आत्मचिंतन करावे. असे सुचित करावे वाटत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ५६३ बस स्थानकांनी अ, ब, क, वर्गातील स्वच्छ बस स्थानक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या तसेच त्याबाबत केलेल्या उपाययोजना यावर आधारित राज्यस्तरातील अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची बक्षीस ठेवण्यात आली. बस स्थानक विकास या संकल्पनेवर लोकसहभागातून जावळी तालुक्यातील प्रवाशांनी विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांनी बस स्थानक स्वच्छता राखण्यासाठी स्थानक परिसराचे सुशोभीकरण, रंगरंगोटी ,बाग बगीचे, वृक्षारोपण, वॉटर कुलर, सेल्फी पॉइंट व वेळेचे बंधन अचूक पाळ ण्यासाठी घड्याळ तसेच स्वच्छता ग्रह आणि इतर सुविधा निर्माण करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे.
परिवहन महामंडळाच्या मेढा बस स्थानकाने अत्यंत परिश्रमपूर्वक गौरवपूर्ण कामगिरी केलेले आहे. मेढा आगार व्यवस्थापक नीता बाबर, सातारा जिल्हा विभाग नियंत्रक रोहन पलंगे व वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड व सर्व अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र ठरलेले आहेत.
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ स्थानक अभियानांतर्गत सर्वक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकाची मूल्यांकन केले आहे.एस टी बसची संख्या, कर्मचारी व इतर सुविधा याचाही समावेश करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागात अ वर्ग फलटण बस स्थानकाने प्रथम क्रमांकाचे दहा लाखाचे बक्षीस मिळवले आहे. दहिवडी तृतीय क्रमांक आणि ब वर्गामध्ये कराड द्वितीय क्रमांक तसेच क वर्गात औंध बस स्थानक द्वितीय क्रमांक आणि वडूज तृतीय क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील स्पर्धेमध्ये न चमकणाऱ्या उर्वरित बस स्थानक व परिसरातील स्वच्छतेबाबत अधिक जागृत होऊन लोकसहभागातून बस स्थानकाच्या सुधारणेबाबत योग्य रीतीने पाऊल उचलावे. पर्यटन वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे सातारा जिल्ह्यातील बस स्थानक म्हणजे वाई, पाचवड, शिरवळ, खंडाळा, नागठाणे, रहिमतपूर, सातारा, पाटण, महाबळेश्वर यांच्या स्वच्छता स्पर्धेत क्रमांक आला नसला तरी पर्यटन वाढीसाठी या ठिकाणी अनेक प्रवासी येत असतात. याकडेही लक्ष दिले पाहिजे. स्वच्छतेबाबत जागरूकता आलेली असली तरी बस स्थानक परिसरात मिळणारा पान मसाला, गुटखा, सिगारेट तसेच पिण्याच्या पाण्याच्या व दारूच्या रिकाम्या बाटल्या घेऊन येणाऱ्या रिकामटेकडे लोक व प्रवाशांवरही निर्बंध घालणे तेवढेच गरजेचे आहे. सफर रोज का है,,, लेकिन जाना कही भी नही,,, असे अनेक जण काही बस स्थानकामध्ये मुक्काम करून आहेत. त्यांची हकलपट्टी करणे गरजेचे आहे .कारण, ते अस्वच्छतेचे जनक ठरलेले आहेत. यासाठी विशेषतः पोलीस यंत्रणेने दक्ष राहिले पाहिजे.
पिण्याच्या पाण्याची समस्या ही अत्यंत बिकट असून पूर्वी बस स्थानकामध्ये प्रवासी पिण्याचे पाणी भरून घेण्यासाठी गर्दी करत होती .आता मात्र चूळ भरण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही. हे सुद्धा वास्तव्यसमोर आलेले आहे. स्थानिक नगरपंचायत व ग्रामपंचायत निजाकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे.बस स्थानक स्वच्छ असेल तर प्रवासाचा कंटाळा येत नाही. त्यामुळे प्रवाशांची सुद्धा मोठी जबाबदारी असून बस स्थानक परिसरात जे जाहिरात बाजी करतात. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. अशी विनंती करण्यात येत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button