क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकण:-काका-भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासत एका काकानेच केला भाचीवर बलात्कार.

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

संपादक प्रल्हाद चव्हाण:-८२०८७१७४८३.

काका-भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासत
एका काकानेच केला भाचीवर बलात्कार.

चाकण, दि. 14 (शफिक शेख) :- आज समाजामध्ये दिवसेंदिवस महिला आणि लहान मुलीसुद्धा घरातही सुरक्षित राहू शकत नाही. पवित्र नातीही या मुलींना आणि महिलांना सुरक्षित ठेवण्यात असमर्थ ठरत आहेत. काका-भाचीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना ही चाकण येथे घडली आहे. खालुंब्रे, ता. खेड येथील एका 15 वर्षीय भाचीचा तिच्याच काकाने बलात्कार करून काका-भाचीच्या नात्याला काळीमा फासला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबात सविस्तर माहिती अशी की, 15 वर्षांची फिर्यादी मुलगी ही तिच्या मावशीसोबत सुभाष बोत्रे यांच्या खालुंब्रे, ता. खेड येथील खोलीत भाडयाने राहत होती. दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी फिर्यादी ही घरात एकटी असताना तिच्या 42 वर्षीय काका गुणवंत भोंडेकर याने तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक पद्धतीने तिच्यासोबत चाळे करून तिचा बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार थोडे दिवस कोणालाही सांगितला नाही.
खूप दिवसांनी जेव्हा ती या धक्क्यातून सावरली तेव्हा तिने 14 ऑक्टोबर 2022 रोजी धाडस करीत चाकण (म्हाळुंगे) पोलीस स्टेशनला जावून तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेत भादंवि कलम 376, 376(2), (क), (ख), (ग) अन्वये गुन्हा दाखल केला. आणि त्वरित तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, सदर आरोपी हा फरार असून सर्वत्र त्याचा शोध सुरू आहे. आपण लवकरच त्याचा शोध घेवून सदर मुलीस न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास दिला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button