कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-मंगळवारी दि:२५ रोजी एक दिवसीय साताऱ्यात उद्योजकांचा महासंवाद.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

मंगळवारी दि:२५ रोजी एक दिवसीय साताऱ्यात उद्योजकांचा महासंवाद.

सातारा : सॅटर्डेचा ग्लोबल ट्रस्ट ,सातारा विभागाच्या वतीने मंगळवार दि. २५ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उद्योजकांचा महासंवाद हा कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मराठा उद्योजक घडवणे. हा या मागील उद्देश असून या कार्यक्रमास जिल्हयातील ५०० हुन अधिक उद्योजक सहभागी होणार असल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन किशोर सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रेरणादायक वक्ते असलेले जेष्ठ मार्गदर्शक माधवराव भिडे यांनी ७९ व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर सॅटर्डेचा ग्लोबल ट्रस्टची महाराष्ट्रात तेवीस वर्षाच्या पूर्वी सुरुवात केली आहे. मराठी उद्योजक निर्माण करावा, या उद्देशाने एका चॅप्टर मधील सदस्य महिन्यातून दोनवेळा एकत्र येवून चर्चा व मार्गदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात चार हजारहून अधिक नोंदणीकृत सदस्य ट्रस्ट मध्ये आहेत. हा ट्रस्ट कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन वा मार्केटिंग करीत नाही, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
एकमेका सहाय्य करु, अवघे होवू श्रीमंत, ब्रिदवाक्यानुसार संस्था वाटचाल करीत आहे. राज्यातील सर्व उद्योजक एकत्र करणे हा या मागचा हेतू आहे. या उदयोजक संवादातून बिझनेसची देवाण-घेवाण होते. या ट्रस्टच्या माध्यमातून सातार्‍यात आतापर्यंत दोनशे हुन अधिक छोटे-मोठे उद्योजक घडले आहेत. अजून उद्योजक घडावेत यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी उद्योजकांचा महासंवाद हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे होणार आहे. यात टी अँड टी इन्फ्राचे शिवराम थोरवे, पितांबरी प्रोजेक्ट्चे रवींद्र प्रभुदेसाई हे मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रेरणादायी वक्ता म्हणून शरद तांदळे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत होणार असून याला सातारा जिल्हयातील उद्योजकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी इव्हेंट हेड प्रणित कुंदप, संदीप जाधव, संतोष खटावकर, संकेत पवार, संदीप पंडितराव, सचिन कुंभार, विशाल रहाटे, अजय शिंदे, निरंजन शेजवळकर, सुहासिनी निकम, रोहित शिंदे व कृष्णात मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

———————————&&&——————— फोटो – सातारा जिल्ह्यातील उद्योजक महासंवाद माहिती देताना मान्यवर (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button