ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे पिंपरी:-अमृत योजनेच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका – दिपक खैरनार

प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

अमृत योजनेच्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका – दिपक खैरनार
पिंपरी, दि. 21 (शफिक शेख) :- अमृत योजनेअंतर्गंत निगडी विभागातील से.२२ मधील ड्रेनेज लाईनच्या कामास मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील काम सुरू न करता नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार ठेकेदाराकडून सुरु आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन सदर ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी, तसेच या कामासाठी अन्य ठेकेदाराची नियुक्ती करून रखडलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामास तात्काळ सुरूवात करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेअंतर्गंत दि. 13 जुलै 2022 रोजी एस. एम. सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. (ठाणे) या संस्थेस कामाचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार निगडी विभागातील से. २२ मधील ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत नमुद असून यात ‘एकता चौक ते अंकुश चौक, संजय हॅाटेल ते अंकुश चौक व अंकुश चौक ते नाला’ असे कामाचे स्वरूप आहे. या विभागातील ड्रेनेज लाईनची समस्या पाहता ठेकेदारास ‘कामाचा आदेश’ मिळाल्यानंतर सदरील काम हे तात्काळ सुरु करणे गरजेचे होते. नागरिकांनी अनेवेळा तक्रारी करून देखील ड्रेनेज कामाची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे. यामुळे से. २२ मधील ड्रेनेज व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. महापालिका प्रशासनाचे ठेकेदारावर नियंत्रण आहे की नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला अमृत योजने अंतर्गत येणारी कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. परंतू याचे ठेकेदारास गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. तसेच पिंपरी महापालिकेचा ड्रेनेज विभाग या ठेकेदारास पाठीशी घालत आहेत. ठेकेदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी यात लक्ष घालून दोषी असणारे ड्रेनेज विभागातील सह शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याने भरलेली अनामत रक्कम, सुरक्षा रक्कम व बयाना रक्कम जप्त करावी तसेच ड्रेनेज लाईनचे काम तात्काळ पुर्ण करण्या संदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खैरनार यांनी दिला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button