सातारा जिल्हाधिकारी यांनी कारागृहाची केली संपूर्ण पाहणी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जिल्हाधिकारी यांनी कारागृहाची केली संपूर्ण पाहणी…
सातारा दि: सातारा शहर पोलीस ठाण्यानजिक जिल्हा कारागृह येथे बोर्ड ऑफ व्हिजिटर्स बैठक झाली. यावेळी सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्यासह मान्यवरांनी संपूर्ण कारागृहाची पाहणी करून कामकाजाबद्दल उपयुक्त सूचना करण्यात आल्या. तसेच समाधान व्यक्त केले.
बुधवार दिनांक २५ जून रोजी सातारा जिल्हा कारागृह येथे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड ऑफ व्हिजीटर्सची बैठक झाली . संपूर्ण कारागृहाची पाहणीमध्ये कारागृहातील बंदयांच्या काही अडचणी, समस्या, तक्रारी आहेत का? याची पाहणी करण्यात आली. बंदयांसाठी कारागृहात पुरेशी जागा आहे किंवा कसे? याची पाहणी करून कारागृहातील नवीन बराक, बंदयांसाठी सुसज्ज ग्रंथालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कायदेविषयक मार्गदर्शनासाठी क्लिनिक, बंदयांची कारागृहात घेतली जाणारी ओळख परेड यासाठी स्वतंत्र हॉल, सुरक्षेसाठी मोकळ्या जागेत शेड बांधणे, नवीन बराकवर सोलर रूट टॉप, सुरक्षा तपासणीसाठी एक्सरे मशीन, सी.सी.टी.व्ही. कंट्रोल रूम बांधणे, बंदयांच्या भेटीस येणाऱ्या नातेवाईकांसाठी वेटिंग रूम, वॉशरूम बांधणे, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यांनी कारावास भोगला त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्तंभ उभारणे व कारागृहाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवीन निवासस्थाने बांधणे या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. उपयुक्त बाबींबाबत सूचना करून त्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री श्रीपाद जाधव, प्रशांत खैरमोडे यांना सूचना करण्यात आली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संपूर्ण कारागृहाच्या सुरक्षेची, बंदयांच्या अडीअडचणीची बारकाईने पाहणी करून कारागृहाच्या सुरक्षेसाठी ज्या-ज्या बाबींची आवश्यकता आहे, त्या सर्व बाबींची प्राधान्याने पूर्तता करण्याची हमी दिली.
सदर बैठकीस समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव निना बेदरकर, मुख्य शासकीय वकील महेश कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, जिल्हा शासकीय रुग्णालयचे डॉ. मोहोळकर, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, उपअभियंता प्रशांत खैरमोडे, अभियंता साईराज कुंभार, विद्युत अभियंता स्वप्नील पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ, परिविक्षा अधिकारी सुरत्राण, परिविक्षा अधिकारी नितीन इरकल तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, सतीश कदम व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कारागृहातील बंदी वान यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आला.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
______________________________
फोटो — सातारा कारागृहाचे पाहणी करताना जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील व मान्यवर (छाया– अजित जगताप सातारा)