पंढरपूर:-शिवशंभू संघटनेच्या वतीने महसूल नायब तहसिलदार पंढरपूर यांना मराठा जातीचे (SEBC) दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
पंढरपूर दि 20
शिवशंभू संघटनेच्या वतीने
महसूल नायब तहसिलदार पंढरपूर यांना मराठा जातीचे (SEBC) दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सध्या सुरु असलेले शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याचे आढळून आले आहे व सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण शासन निर्णय ५ जुलै 2024 नुसार मराठा विद्यार्थ्यांना जातीचा व नॉन क्रिमिलेअर दोन्ही दाखले वेगवेगळे देण्याचा आदेश देण्यात आल्या मुळे मराठा विद्यार्थींना शैक्षणिक प्रवेश डिग्री /डिप्लोमा/इंजिनिअरिंग /B. SC Agriculture साठी जात पडताळणी दाखला किंवा दाखल केल्याची पावती बंधनकारक असलेचे विविध संस्था व कॉलेज कडून सांगितले जात आहे व प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची मुदत 24 जुलै 2024 आहे . परंतु शासनाने काढलेल्या 5 जुलै 2024 चा शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडे जातीची दाखले उपलब्ध नसल्याने जात पडताळणी साठी विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे तरी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की 5 जुलै 2024 च्या निर्णयानुसार SEBC मराठा जातीचे दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे कारण जातीचे दाखले कमी वेळेत मिळाले तर विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल करता येईल व मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही .यासाठी आपण खबरदारी म्हणून वेगळा आपत्कालीन कक्ष स्थापन करुन मराठा SEBC दाखले 2 ते 3 दिवसात विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाय योजना करावी अन्यथा शिवशंभू संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला, यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, अमोल शिंदे, देवराज जावळे, उपस्थित होते.