श्रीरामपूर येथे शासकीय CCI कापूस खरेदीत सुरू असलेल्या घोटाळ्यांची ,अनागोंदीची चौकशी करून दोषींवर संघटित गुन्हेगारी (मोका)कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत – स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपूर येथे शासकीय CCI कापूस खरेदीत सुरू असलेल्या घोटाळ्यांची ,अनागोंदीची चौकशी करून दोषींवर संघटित गुन्हेगारी (मोका)कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत – स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना.

श्रीरामपूर (प्रतिनिधी )स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील पालकमंत्री ,आमदार ,खासदार , जिल्हाधिकारी यांना अखंड पाठपुरावा करत नगर जिल्ह्यात शासकीय शेतीमाल सोयाबीन ,कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगांव येथे शासकीय CCI कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले खरेदी केंद्र मंजूर होऊनही एक महिना उशिराने सुरू करण्यात आलेने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती.मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांनी CCI कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणलेला कापूस ग्रेड चे कारण सांगून रीजेक्ट केला जातो CCI चे कापूस खरेदीसाठी 20 प्रकारच्या ग्रेड आहेत असे असूनही कापूस रिजेक्ट केला जातो आहे रिजेक्ट केलेला तोच कापूस कमी भावात खरेदी केला जातो सोबत संबधित शेतकऱ्यांचे बँक खाते,७/१२ उतारा केंद्र चालकाकडून ताब्यात घेण्यात येतो आणि पुन्हा तोच रीजेक्ट केलेला कापूस CCI ला शासकीय MSP हमीभावाने विकण्यात येत आहे.

अशाप्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट केली जाते आहे शेतकऱ्यांचा रीजेक्ट केलेला कापूस 7 हजार रुपये क्विंटल ने खरेदी करून CCI ला 8000 – 7800 रू ने CCI ला विकण्यात येत आहे त्यासाठी संबधित शेतकऱ्यांना क्विंटल मागे 150 -200 रू देण्याचे आमिष दाखवून त्यांचे बँक खाते,७/१२ ताब्यात घेण्यात येत आहे वास्तविक शासनाने शासकीय शेतीमाल खरेदी केंद्रे ही शेतकऱ्यांचे हितासाठी सुरू केली आहेत परंतु शेतकऱ्यांचे आडून सदर कापूस खरेदी केंद्र चालक व CCI चा ग्रेडर संगनमताने शेतकऱ्यांची अडवणूक करून शासकीय कापूस खरेदीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रती क्विंटल 1000 ते 800 रू ची लूट करीत आहेत . कापूस उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र चालक व CCI ग्रेडर मिळून संघटित पणे प्रचंड मोठी आर्थिक लूट करीत आहेत.
सदर शासकीय शेतीमाल खरेदीवर देखरेख,व्यवस्थापन करण्याची जबाबदारी शासनाने आपणावर सोपविली आहे तरी आपण या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन संबधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी,आजवर झालेल्या कापूस खरेदीची यादी प्रसिद्ध करून त्यात प्रत्यक्ष कापूस उत्पादक शेतकऱ्यांने स्वतः चा किती कापूस विकला व केंद्र चालकाने शेतकऱ्यांचे बँक खाते,७/१२ ताब्यात घेऊन किती कापूस CCI ला विकला याची चौकशी करून संबंधितांवर संघटित गुन्हेगारी (मोका ) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत सदर चौकशी 30 डिसेंबर 25 पर्यंत करून सदर घोटाळा ,अनागोंदी न थांबविल्यास शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर तीव्र आंदोलन करेल त्याचप्रमाणे आपणावर जबाबदारी असूनही आपण कारवाई करण्यात टाळाटाळ केल्यास शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष 1 जानेवारी 26 रोजी न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करून आपणासही सहआरोपी करेल याची दखल घ्यावी अशी तक्रार श्रीरामपूरचे तहसीलदार श्री मिलिंद वाघ यांना नायब तहसीलदार अ.श. राजवळ यांच्या हस्ते देण्यात आले तक्रारीची प्रत माहितीसाठी शासकीय शेतीमाल खरेदी केंद्राची जबाबदारी असलेल्या मान.तहसीलदार श्रीरामपूर, सभापती,सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर , तालुका सहकारी सहायक निबंधक श्रीरामपूर श्री गडेकर यांना देण्यात आले या तक्रारीवर स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे ,उपाध्यक्ष नवनाथ दिघे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनीता वानखेडे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव ,कोमल वानखेडे , युवा आघाडीचे मयूर भनगडे , अशोक आव्हाड ,मधुकर काकड,श्रीराम त्रिवेदी ,रवी वानखेडे ,बाबासाहेब गायकवाड ,बाळासाहेब घोगरे ,शीतल पोकळे,मंदा गमे, आशा महांकाळे,शिला वानखेडे व कापूस उत्पादक शेतकरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
( स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते,७/१२ बँकेची विड्रॉल स्लीप कोणासही ताब्यात देऊ नये अन्यथा असे बँक खाते ताब्यात देणारे शेतकऱ्यांना पण सहआरोपी करण्यात येणार आहे अशी सूचना स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी केली आहे .)
चौकट




