ताज्या घडामोडी

सातारा:-पॅंथर सेनेच्या सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी रमेश गायकवाड

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

पॅंथर सेनेच्या सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी रमेश गायकवाड

सातारा दि: फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीची कार्यशाळा म्हणून सातारा जिल्ह्याकडे पाहिले जाते. या भूमीतील सुपुत्र महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ जगत असतात. सर्वसामान्य कुटुंबातील रमेश गायकवाड यांची नुकतीच ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड झाल्याने सामान्य कार्यकर्त्याला समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा तालुक्यातील हमदाबाज या छोट्याशा खेड्यातील रमेश गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्या पासून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केलेली आहे. सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अत्यंत सामान्य कुटुंबातील रमेश गायकवाड सर्वांच्या परिचित असून त्यांनी निस्वार्थीपणाने आंबेडकरी चळवळीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे सेना प्रमुख सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेली आहे. आगामी विधानसभेच्या सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघात कोणत्याही अमिषाला बळी न पडता ते प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहेत.
साताऱ्यातील महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ऑल इंडिया पँथर सेना मध्ये सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी रमेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळेस ऑल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड ,जिल्हा सचिव आशिष मोरे ,अनमोल कांबळे, मनोज जगताप तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
सामान्य कुटुंबातील रमेश गायकवाड यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली असून त्या संधीचे ते निश्चितच सोने करतील कोणत्याही प्रस्थापित घराण्याची त्यांचा संबंध नसून आंबेडकर चळवळीशी त्यांचा संबंध आहेत .त्यांच्या या निवडीने खऱ्या अर्थाने चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितच यश संपादन होईल. असा विश्वास भाजप युवा मोर्चा उपजिल्हाध्यक्ष रोहित कीर्दत, भाजप आरोग्य विभाग जिल्हा उपजिल्हाध्यक्ष पंकज खुडे, सागर कारंडे, संकेत धावडसकर, हेमप्रसाद भालेकर, राज कीर्दत व मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे. राजकीय पक्षात मतभेद असू शकतात. पण सामान्य कार्यकर्त्याला मिळालेली संधी ही सर्वांना प्रेरणादायक असते .अशा शब्दात पंकज खुडे यांनी श्री रमेश गायकवाड यांचे अभिनंदन केलेले आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार अजित जगताप उपस्थित होते.
—————————————
फोटो ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा युवक उपाध्यक्ष रमेश गायकवाड यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button