ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजकारण करावे : छ. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजकारण करावे : छ. आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले.

सातारा : मानव हा समाजशील प्राणी आहे.त्यामुळे स्वत:चा व्यवसाय-नोकरी सांभाळुन राजकारण,समाजकारण आदी आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहावे. असे आवाहन श्रीमंत छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
माळ्याची वाडी,ता.सातारा येथे हॉटेल गावकारीचा उदघाटन सोहळा छ. आ.भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.तेव्हा ते उद्घाटनपर मार्गदशन करीत होते.
छ.आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “युवकांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर धरसोडवृत्ती टिकत नाही.तेव्हा कायम निष्ठा असेल तर यश मिळण्यास साह्य होते.हॉटेल व्यवसायात स्वतःची खास अशी ओळख निर्माण करावी.जवळच असणाऱ्या जलसागरचा आदर्श घ्यावा.मेणकर-यादव यांनी केलेली पार्टरशीप नक्कीच खवय्याना खेचून घेण्यात यशस्वी होईल.सध्या हॉटेलमध्ये स्पर्धा असल्याने स्वतःचा पॅटर्न व चविष्ट जेवण दिले तर नक्कीच उत्तरोत्तर व्यवसायाची वाढ होईल.”
धर्मराज घोरपडे म्हणाले, “निसर्गरम्य ठिकाण असल्याने हॉटेलला लाभ मिळेल.मात्र, त्रिकुटानी ग्राहकांना सेवा कायमस्वरूपी देण्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध असले पाहिजे.”
शहारालगतच गावकारीचा स्वाद घेण्यासाठी सातारा व महाबळेश्वर रस्त्यास ये-जा करणाऱ्यांची पावले आपोआप वळतील.मात्र,दर्जा उत्कृष्टच असला पाहिजे.या अर्थाने अनेकांनी मार्गदर्शन केले.
हॉटेल गावकारीचे प्रो.प्रा. इंजि. धनंजय यादव,अमोल मेणकर व विश्वनाथ यादव यांनी स्वागत करून मान्यवरांचा सत्कार केला.संभाजी इंदलकर यांनी प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास विक्की वाघमळे, मोहन शिर्के,विशाल साळुंखे, सचिन पालवे,सागर पवार, अविनाश कदम,दिनकर कदम, संभाजी इंदलकर, जीतेंद्र सावंत व हणमंत सावंत (लिंब),राहुल काळे,क.अभियंता आशिष देशपांडे,दिलीप निंबाळकर, बाळासाहेब इंदलकर, चैतन्य, गणेश निंबाळकर, प्रवीण मस्के, विजय इंदलकर,महाबळेश्वर तालुका विकास संस्थेचे समन्वयक रखमाजी यादव, विलास यादव,रवींद्र भालेराव, एन. नवनाथ,जे.छाया,नामदेव इंदलकर,दीपक,के.चव्हाण,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर संतोष भोसले,संतोष इंदलकर, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button