साताऱ्यात महामानव डॉ. आंबेडकर यांना श्री. छ. खा. उदयनराजे यांच्याकडून विनम्र अभिवादन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात महामानव डॉ. आंबेडकर यांना श्री. छ. खा. उदयनराजे यांच्याकडून विनम्र अभिवादन.
सातारा दि :महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एक चांगला मार्गदाता दिलेला आहे. त्यामुळे देश प्रगतीपथावर येण्यासाठी महत्त्वाचा वाटा संविधानाने उचललेला आहे. अशा या महा मानवाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
सातारा नगरपालिकेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. या वेळेला प्रवीण धस्के, विजय बडेकर, अण्णा वायदंडे, सतीश रावखंडे, डॉ. अच्युत गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. त्यांचा सहवास लाभला पाहिजे होता. पण, त्यांच्या विचाराचा सहवास आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे. सर्व जाती धर्माचा विचार करून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे. अफाट व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर युगपुरुषांची नेहमीच आठवण ठेवली पाहिजे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. कारण, सध्या महत्त्वाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय शुभेच्छा देणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जयंती सोहळा आनंदा साजरा करावा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने सातारा शहर व परिसरातील आंबेडकर अनुयायी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय या घोषणा देऊन गोपुरुषांच्या जयजयकार केला तसेच सर्व धर्म समभावाची ही दृष्टी पाहण्यास मिळाली.