पोलीस मित्र समिती वाई व ग्रामपंचायत पसरणी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला पसरणी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

पोलीस मित्र समिती वाई व ग्रामपंचायत पसरणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०३/०८/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला पसरणी गावात उत्स्फूर्त प्रतिसाद.
घोटवडेकर हॉस्पिटल वाई यांच्या विद्यमाने महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पसरणी या गावात काल घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरास 110 लोकांनी सहभाग नोंदवला. डॉक्टर पुष्कराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य मित्र सत्यम जाधव आणि किरण म्हेत्रे यांनी विशेष सहकार्य केले. या उद्घाटन प्रसंगी अशोकराव (बापू) गायकवाड, अभि भाऊ पवार पोलीस मित्र समिती वाई तालुका अध्यक्ष, सरपंच सौ हेमलता अशोकराव गायकवाड, यादव आबा महांगडे, भगवानराव पाटील, विलास बापू येवले, विशाल शिर्के, उपसरपंच सुनिल दादा महांगडे, उपसरपंच बद्रीनाथ महांगडे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.