ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ:-जावळीच्या सर्वपक्षीय प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भाव वधारला…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

जावळीच्या सर्वपक्षीय प्रामाणिक कार्यकर्त्यांचा भाव वधारला…

कुडाळ दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी कड्या कपारीतून नारा देणारे जावळीचे मावळे यांनी इतिहास घडवला होता .आज लोकशाहीमध्ये सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जावळीतील प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. याचे भान सामान्य मतदारांना आले आहे.
महायुतीचे श्री.छ.खा.उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीचे आ.शशिकांत शिंदे हे दोन तगडे उमेदवार आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय गाडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खरे कुरुक्षेत्र हे जावळी तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी २०१९ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत सातारा- जावळी मतदार संघातील तीन लाख छत्तीस हजार ३६८ मतदारांपैकी १ लाख ९८ हजार६५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये श्रीनिवास पाटील यांना ७२,८६४ श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना एक लाख १८ हजार८९८ वंचित आघाडीला २८९७ मते मिळाली होती. उर्वरित उमेदवारांनाही तीन आकडी मतदान झाले होते. आता मतदारांची संख्या वाढली आहे त्याचबरोबर राजकीय पटलावरती मोठ्या घडामोडी झालेले आहेत.
सध्या सातारा- जावळी विधानसभा मतदार संघात एकूण तीन लाख ३३ हजार ९५८ मतदार आहेत. जावळी तालुक्याचा विचार केला तर १६० गावात पावणेदोन लाख मते हे जावळीकरांची आहेत. कारण, जावळीतील काही सुपुत्र हे सातारा तालुक्यामध्ये वास्तव्यास असून त्या ठिकाणी त्यांचे मतदान आहे.
जावळी खोऱ्याचा इतिहास पाहिला तर चौदाव्या शतकात पाच हजार मुस्लिम फौजा जावळीवर चाल करून गेल्या होत्या. त्या परतल्या नाहीत. असा इतिहास आहे.
जावळी तालुक्यात मेढा, करहर, केळघर कुडाळ, आनेवाडी, सायगाव अशी प्रमुख बाजारपेठ असलेले मोठी गावे आहेत. त्या ठिकाणचे नेतेगण मंडळी हे सध्यातरी महायुतीकडे जास्त आहेत. पण, सामान्य कार्यकर्ता व मतदार हा महाविकास आघाडीकडे सहानुभूतीने व निश्चयाने पाहत आहेत . प्रत्येक निवडणुकीमध्ये काही बाजारू कार्यकर्ते व त्यांचे नेते हे मतदारांना गृहीत धरत असतात .आता मात्र जावळीचे भूमिपुत्र आमदार शशिकांत शिंदे हे उमेदवार असल्यामुळे प्रादेशिक अस्मिता जागी झालेली आहे. हे नाकारून चालणार नाही.
जावळी म्हणजे वाघाची जाळी आता या वाघाची जाळी तोडून मतदारांना आकर्षित करणे किती यशस्वी होईल? हे सांगणे महा कठीण आहे .सातारा जावळीचे भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा इतका जावळीमध्ये खेड्यापाड्यात संपर्क आहे. सामान्य कार्यकर्ता सुद्धा त्यांची थेट भेट घेऊ शकतो. आ. भोसले हे प्रामाणिकपणाने प्रचार यंत्रणेत महायुतीचे काम करत आहेत. परंतु ते स्वतः लोकसभेला उमेदवार नसल्यामुळे लोकसभेचे उमेदवार श्री. छ . खा. भोसले यांच्या जावळी तालुक्यातील गटाला आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटावर अवलंबून राहावे लागले आहे. हे त्रिवार सत्य आहे. सर्व सुविधा व नियोजन केल्यानंतरच काही पक्ष बदलू व निष्ठा बदलू कार्यकर्ते प्रचारात बाहेर पडत आहेत. या उलट जावळीतील सामान्य कार्यकर्ता हा भूमिपुत्रासाठी समर्पित धोरणानुसार प्रचार यंत्रणा राबवत आहे. त्यामुळे थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यास मार्ग सोपा झालेला आहे. असे चित्र खेड्यापाड्यात स्पष्ट पणाने दिसून आले आहे.
सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जावळीत विखुरलेले आहेत. नेत्यांच्या मागे मागे जाण्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्ता हा आता स्वयंभू झालेला आहे . या सामान्य कार्यकर्त्याचे भाव वधारला आहे. एकतर्फी वाटणारी निवडणूक आता रंगबिरंगी बनलेली आहे . जावळीचे भूमिपुत्र त्याचबरोबर दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते यांनी निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीला जावळी खोऱ्यात बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे. जावळी खोऱ्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न वाढती बेरोजगारी, पर्यटन वाढीसाठी अनुकूल वातावरण असूनही प्रकल्प राबले नाहीत. अजून कालवे नाहीत. बॉण्डर वाडी धरणाची अजून पायाभरणी नाही केंद्राच्या आखरीत येणारे फॉरेस्ट बाबत अनेक रस्ते अडकून पडलेले आहेत. अशी भली मोठी प्रश्नांची जंत्री सोडवण्यासाठी सक्षम उमेदवार असणे गरजेचे आहे. हे आता मतदारांना सांगावे लागत नाही.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button