कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:- दि वाई अर्बन को.ऑप. बँकेच्या दिनदर्शिका- 2026 चे प्रकाशन करताना बँकेचे अध्यक्ष श्री.अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. श्री.शेखर कांबळे, संचालक अशोक लोखंडे,चंद्रकांत गुजर व मान्यवर.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 दि वाई अर्बन को.ऑप. बँकेच्या दिनदर्शिका- 2026 चे प्रकाशन करताना बँकेचे अध्यक्ष श्री.अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. श्री.शेखर कांबळे, संचालक अशोक लोखंडे,चंद्रकांत गुजर व मान्यवर.

*वाई अर्बन बँकेची माहितीपूर्ण दिनदर्शिका – अनिल देव*

वाई, दि. 28 – दि वाई अर्बन बँकेने सन 2026 या सालाकरीता आकर्षक व सर्व तिथींची माहिती समाविष्ट करून दिनदर्शिका प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्री कृष्णाबाई उत्सव व इतर तिथींची सविस्तर माहिती असल्याने ही दिनदर्शिका आकर्षक व संग्राह्य अशी आहे, असे बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी सांगितले.
बँकेच्या नवीन दिनदर्शिकेचे प्रकाशन उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे, संचालक अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे व मान्यवरांच्या उपस्थित नुकतेच पार पडले. अनिल देव म्हणाले, गेल्या अऩेक वर्षांपासून आपली बँक दिनदर्शिका प्रकाशित करीत असते. याही वर्षी बँकेने आकर्षक अशी दिनदर्शिका छापली आहे. 2026 दिनदर्शिकेच्या माध्यमांतून बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांची माहिती खातेदार-ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येत असते. तसेच सामान्य जनतेला बँकिंगच्या सुविधांची माहिती मिळत असते. बँकेच्या 27 शाखांमध्ये ही दिनदर्शिका उपलब्ध करून देणेत आली असून बँकेचे सभासद, खातेदार यांनी दिनदर्शिका घेऊन जावी, असे आवाहनही अध्यक्ष देव यांनी केले.
उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे म्हणाले, बँकेने खातेदारांसाठी वैयक्तिक वापराचे दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीसाठी 8.50 टक्के इतका माफक कर्ज व्याजदर ठेवला आहे. त्याचप्रमाणे घर बांधकाम करणे, फ्लॅट खरेदी, बंगला बांधणे यासाठीच्या कर्जाचा व्याजदर 9 टक्के इतका आहे. सोनेतारण कर्जासाठी प्रती तोळा रू. 75 हजार इतके कर्ज दिले जात असून त्यासाठी सर्वात कमी असा सव्वा नऊ टक्के व्याजदर आहे. याप्रमाणे अन्य कर्जांचा व आकर्षक ठेव व्याजदरांचा खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डाँ. कांबळे यांनी केले.
कॅलेंडर प्रकाशन कार्यक्रमास डाँ. विवेक मराठे, अमृतलाल ओसवाल, जनार्दन पुजारी, डाँ. शितल लोखंडे, विवेक लोखंडे आदी व सभासद, खातेदार उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button