आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

महाबळेश्वर:-विल्सन पाॅईंट कङे जाणारा रस्ता दुरुस्तीची मागणी…

पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार रियाज मुजावर महाबळेश्वर तालुकाध्यक्ष
विल्सन पाॅईंट कङे जाणारा रस्ता दुरुस्तीची मागणी…

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नगर पालिका प्रशासक (मुख्याधिकारी),वनविभाग यांच्याकङे केली निवेदना द्वरे मागणी.

विल्सन पाॅईंट हे महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे.हा पाॅइंट सुर्योदय साठी प्रसिध्द आहे.सुर्योदयाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.येथे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी जात असतात.हा रस्ता पुर्णत: खराब झाल्याने पर्यटकांना वाहन चालवणे धोक्याचे असल्याने आणि विशेष करुन पायी फिरण्यासाठी येणारे पर्यटक व स्थानिक नागरिक येत असतात परंतु ह्या रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे या रस्त्याने चालणे देखिल मुश्कील झाले आहे.
त्यामुळे नगरपालिका व वनविभाग यांनी योग्य दखल घेउन हा रस्ता पर्यटकांसाठी सुरळीत व्हावा या साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नगरपालिका व वनविभाग यांना निवेदन देण्यात आले.या वेळी जिल्हा संघटिका राजश्री ताई भिसे,शहर प्रमुख राजाभाऊ गुजर,युवा सेना शहर प्रमुख आकाश साळुंखे,उप शहर प्रमुख उस्मान भाई खारखंङे,विभाग प्रमुख राजेंद्र पंङित,शंकर ढेबे,शहानवाझ खारखंङे,पत्रकार राजेश सोंङकर,आशोक मामा शिंदे आदी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button