वाई:-म.फुलेनगर येथे कांतीसूर्य म.ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
म.फुलेनगर वाई म.फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
वाई १३/०४/२५ – म.फुलेनगर येथे कांतीसूर्य म.
ज्योतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमीत्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात वृक्षांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे वाई नपा शाळा क्रमांक.७ चे मुख्याध्यापक लक्ष्मण हुंबरे यांनी उपस्थितांना यथोचीत मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात प्रतीपादन करताना त्यांनी फुले प्रेमींना थोर पुरुषांचे विचार आत्मसाद करण्याचे अवाहन केले.” अक्षर ती मुकी होती, मुके होते जन!गुलामीचे सण होते, गुलामीत मन! ज्योतीबांना याची जाण होती कि,जोपर्यत अक्षरे बोलती होणार नाही, तोपर्यंत येथील बहुजन समाज गुलामीतून मुक्त होणार नाही म्हणून ज्योतीबांनी शिक्षणाला महत्व देवून स्त्री शिक्षणाची बीजे या महाराष्ट्रात सर्व प्रथम रोवली.
तसेच सध्याच्या स्त्रियांनी काय करावे याविषयी बोलताना सांगीतले, की, करू नको तू परपरांचे व्रत , ही धर्म व्यवस्था तुला गुलाम करील वाच तू ज्योतीबा, ते तुला अन्याया विरुद्ध तयार करील !म.फुले जयंतीचे औचीत्य साधून सांगण्यात आले.