आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर चे शेंदुरजणे येथे श्रमसंस्कार शिबिर.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि.07

किसन वीर चे शेंदुरजणे येथे श्रमसंस्कार शिबिर.

 

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर वरिष्ठ महाविद्यालयातील “राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर’ मौजे शेंदुरजणे येथे दि. ०८ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. सोमवार दि. ०८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता वाई उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. राजेंद्रकुमार जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे संचालक मा. सुरेश यादव हे उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शेंदुरजणेच्या सरपंच सौ. रेखा विलास जगताप, उपसरपंच श्री. जयसिंग रामचंद्र जगताप , विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शेंदुरजणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित राहाणार आहेत.
सदर शिबिरात प्रा. रमेश डुबल, जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, ॲङ मृण्मयी महांगडे -जाधव, ॲङ उमेश सणस, डॉ. विपीन वैराट या मान्यवरांची विविध विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने होणार आहेत. वाईच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी यांच्या उपस्थितीत दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता समारोप होणार आहे. या शिबिरात ग्रामस्वच्छता, जल व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, वनराई बंधारा बांधणे अशी विविध कामे केली जाणार असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी सांगितले. या शिबीरातील कार्यक्रमांचा लाभ शेंदुरजणे ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button