मालवण:-कुडाळ, मालवण तालुक्यातील १५ मंदिरांचा होणार पर्यटन विकास.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

कुडाळ, मालवण तालुक्यातील १५ मंदिरांचा होणार पर्यटन विकास.

‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत ८० लाख रुपये मंजूर.
कुडाळ : कुडाळ मालवण तालुक्यातील देवस्थानांचा चेहरामोहरा बदलणार आहे. आ.नीलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना ‘क’ वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत तब्बल ८० लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मंदिर परिसर सुशोभीकरण व तीर्थक्षेत्र विकास होणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील सुशोभीकरण होणारी मंदिरे
घावनळे श्री स्वामी समर्थ मठ, नेरूर कविलकाटे श्री साई मंदिर, सोनवडे तर्फ कळसुळी श्रीकृष्ण मंदिर, मोरे श्री देवी माऊली मंदिर, श्री कलेश्वर मंदिर नेरूर येथे जलशुद्धीकरण यंत्र, बिबवणे श्री देव गिरोबा मंदिर, श्री देवी सिद्ध सातेरी मंदिर आंजिवडे, श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर आवळेगाव, पांग्रड श्री देव स्वयंभू महादेव मंदिर, हळदीचे नेरूर श्री देव जटाशंकर मंदिर. या सर्व मंदिरांच्या परिसर सुशोभिकरणासाठी
मालवण तालुक्यातील मंदिरे बुधवळे मिर्लेश्वर भगवती मंदिर, गुरामनगरी श्री देव लिंगेश्वर मंदिर, देवली भगवती मंदिर, नांदरुख श्री देव गिरोबा मंदिर, श्री देव लिंगेश्वर मंदिर, असगणी श्री रामेश्वर- पावणाई देवी मंदिर, श्री देव जैन ब्राह्मण मांडवीर मंदिर- पाणलोस. या सर्व मंदिरांच्या परिसर सुशोभिकरणासाठी प्रत्येक ५ लाख रू. निधी मंजूर झाला आहे. प्रत्येक ५ लाख रू. निधी मंजूर झाला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



