ताज्या घडामोडी

पुणे:-येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीत सराईत आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आणून 2,21,000/- किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथकाकडून हस्तगत.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

पुणे शहर दि. 04
येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीत सराईत आरोपीकडून 2 गुन्हे उघडकीस आणून 2,21,000/- किंमतीचा मुद्देमाल येरवडा तपास पथकाकडून हस्तगत.

पुणे शहरामध्ये वाढणाऱ्या वाहनचोरीच्या अनुषंगाने मा.पोलिस आयुक्त मा.सह पोलिस आयुक्त मा.अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मा. उप आयुक्त परिमंडळ 4 मा.सहा पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या.

सदर सूचनेच्या अनुषंगाने दि.2/10/24 रोजी येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोअ सुशांत भोसले व अनिल शिंदे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 संशयीत इसम 2 मोपेड गाडी विक्री करण्यासाठी येरवडा येथे येणार असल्याची माहिती मा.वरीष्ठ पोलिस निरीक्षक रविन्द्र शेळके येरवडा पोलिस स्टेशनला कळविल्याने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलिस निरीक्षक सुनील सोळुंके व अंमलदार सुशांत भोसले अनिल शिंदे विजय अडकमोल स्वप्निल घोलप यांनी तेथे जाऊन संशयित इसमांना पळून जात असताना पकडले व त्यांना ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता 1] यश सागर ओंबाळे वय 23 वर्षे रा दुर्गामाता मंदिराजवळ कंजारभाट येरवडा पुणे. 2] ओमकार राजेश मोरे वय 21 रा. स. नं14 रामनगर येरवडा पुणे येथील असल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यात दोन मोपेड गाडी व सहा मोबाईल मिळाले . सदर चौकशी करता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 35 [ई] अन्वये कार्यवाही करण्यात आली. आरोपीकडून गाड्यांबाबत चतुःशृंगी पोलिस स्टेशन कडील अभिलेख तपासून पहिला असता चतुःशृंगी पोलिस स्टेशन गु र नं 681/24 बी एन एस व शिक्रापूर पोलिस स्टेशन गु र नं 796/24 बी एन एस 303 [2]अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरचे दोन गुन्हे उघडकीस आले. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दोन मोपेड गाडी व सहा मोबाईल असा एकूण 2,21,000 चा माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी श्री अमितेश कुमार सो. पोलिस आयुक्त ,पुणे शहर , रंजन कुमार शर्मा, पोलिस सह – आयुक्त ,श्री मनोज पाटील , अपर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग ,श्री हिम्मत जाधव ,पोलिस उप -आयुक्त परिमंडळ -4,श्रीमती प्रांजली सोनवणे सहा .पोलिस पोलिस आयुक्त येरवडा विभाग, श्री.रवींद्र शेळके वपोनी येरवडा,पल्लवी मेहेरे, पोन्ही गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सपोनी सुनील सोळुंके,पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे,किरण घुटे पोना सागर जगदाळे,पोअं अनिल शिंदे,सूरज ओंबासे,दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे,सुशांत भोसले ,विठ्ठल घुले ,स्वप्नील घोलेप ,विजय अडकमोल यांनी केकेली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button