ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता :-जि.प. व पंचायत समिती निवडणुकीसाठी ग्रामीण भागात आत्तापासून शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांचे सावळीविहीर येथे आवाहन!
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

शिर्डी:-ü∼(कोडीराम नेहे) राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी नुकतीच भेट दिली असता सावळीविहीर फाटा येथे शिवसेना व युवा सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका शिवसेना या स्वबळावर लढवणार असून त्यासाठी ग्रामीण भागात शिवसैनिकांनी आतापासूनच तयारी सुरू करावी .असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी नुकतेच सावळीविहीर फाटा येथे केले आहे.
माजी मंत्री व शिवसेनेचे नेते आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी रविवारी सकाळी सावळविहीर येथे भेट दिली. यावेळी राहता तालुका शिवसेना तसेच राहता तालुका युवा सेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करून त्यांचा सत्कार करण्यात आला. राहाता तालुका युवा सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप विघे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी किरण जपे ,शरद भदे, मा. उपसरपंच उत्तमराव माळी, पिंकेश जाधव, साईनाथ झिंझांड, दत्तू जमधडे ,रमेश ढवळे ,सोमनाथ विघे ,नाना पवार, सचिन विघे ,नरेंद्र वर्पे ,बबलू आदमने ,विवेक जपे ,अतुल चव्हाण, परेश वाघ, संदीप सौंदाणे ,आकाश कानडे, आदींनी यावेळी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना बबनराव घोलप म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठा निष्ठावान आहे. एकही शिवसैनिक येथे उद्धव ठाकरे साहेबांना सोडून कुठे गेला नाही. अशा निष्ठावान शिवसैनिकांमागे खंबीरपणे शिवसेना व आपण उभे आहोत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून ग्रामीण भागात शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी .संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत सर्वतोपरी सहाय्य शिवसेना व आपण करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले. यावेळी सावळीविहीर व परिसरातील शिवसैनिक व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.