सातारा:-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी साठी साताऱ्यात रा.स.प.आंदोलनात.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी साठी साताऱ्यात रा.स.प.आंदोलनात.
सातारा दि: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राजकीय सत्तेसाठी कर्जमाफीची घोषणा केली जाते. सत्ता आल्यानंतर त्याचा विसर पडतो. अशा विसर भोळ्या महायुतीला आठवण करून देण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराचे उत्पन्न जास्तीचे आहे. शेती करणे नुकसानीचे बनले आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे. अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री
ना. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की, आमचे सरकार आल्यास शेतकऱ्याचा
सातबारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती स्थापन
करत वेळ काढूपणा करू नये. उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांची कर्ज राईट मारताना समिती
स्थापन केली जात नाही. पण, महाराष्ट्रातील कष्टकरी ३६ लाख शेतकऱ्यांना २५ हजार कोटींची कर्जमाफी करताना समितीचा अट्टाहास कशासाठी? मेट्रो ट्रेनसाठी १ लाख ८ हजार कोटीची तरतूद महायुती सरकार करत आहे.शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ८६ हजार कोटी शक्तिपीठ महामार्गासाठी दिले जातात. ३६ हजार
कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले जातात. मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने शेतकऱ्यांच्या
आत्महत्या प्रमाण वाढले आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण? त्यामुळे लवकरात लवकर महायुती
सरकारने सरसकट कर्जमाफी करावी.
यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे .
राष्ट्रीय समाज पक्ष नेते काशिनाथ शेवते, उमेश चव्हाण, भाऊसाहेब वाघ, सत्यवान कमाने, खंडेराव सरक, डॉ. रमाकांत साठे, विक्रम माने, निलेश लांडगे, दादासाहेब दोरगे, महादेव कुलाळ व माता भगिनी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी करत सातबारा कोरा करावा. या मागणीला राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेते तसेच लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जनता क्रांती दल आणि इतर शेतकरी संघटना यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
………………………………….
फोटो सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी (छाया- अजित जगताप, सातारा)