आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय तंत्रज्ञान उत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

वाई दि 21.
किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय तंत्रज्ञान उत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद.

 

वाईः जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात बीसीए विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय उत्सवास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उत्सवाचे उदघाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मदनदादा भोसले यांच्या हस्ते झाले. उदघाटनप्रसंगी फ्रेंजन उद्योग समूहाचे मॅनेजिंग पार्टनर पंकज सारडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे, बीसीए विभागाचे समन्वयक प्रो. डॉ. सुनील सावंत, विभाग प्रमुख सौ. अर्चना कदम व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मदन भोसले म्हणाले, “विद्यार्थ्यांनी या आयटी युगात वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावीत. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य सादर करण्याचे व्यासपीठ उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो.” “विद्यार्थ्यांनी “आउट ऑफ द बॉक्स” विचार करावा आणि परंपरागत विषयांपुरते मर्यादीत न राहता सतत शिकत रहावे, तंत्रज्ञानाच्या सतत विकसित होत असलेल्या बदलांशी जुळवून घ्यावे, तसेच प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून वेगवान डिजिटल युगात पुढे राहण्याचे आवाहन मा. पंकज सारडा यांनी केले.
या तंत्रज्ञान उत्सवामध्ये C & C++, पोस्टर प्रेझेंटेशन, पीपीटी प्रेझेंटेशन, गेमिंग, टेक्नो रांगोळी, टेक्नो क्वीज, वेब डीझाइनिंग इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षक म्हणून अमृता काळे जाधव, डॉ.डी एन शिंदे, एस.एम.आगलावे, डॉ मंजूषा इंगवले, एल.एन. रेणापुरे, ए टी सुतार यांनी काम पाहिले. अलिशा पटेल, यशस्विनी अंबाले, राघव माने, सुदर्शन भिसे, प्रथमेश नलावडे, अफताब मुजावर, प्रणव सुर्वे, साहिल भोसले, ओंकार शिंदे, तेजस तरडे, वरूण सिंग, मंदार गायकवाड, श्वेता ढोकळे, अमृता घाटे, निसर्गा जाधव, ओंकार साळुंखे, श्रुति थोरात, शुभम मुळीक, अंकिता कणसे, राजेश्वरी निकम, यश ननावरे, ऐश्वर्या माने, मोरेश्वर वाडकर, रोहन शेवते, राज चव्हाण या विद्यार्थ्यांनी यावेळी झालेल्या विविध आठ स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले. विजेत्या विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऋषिकेश मापारी-चव्हाण, अध्यक्ष मदनदादा भोसले, प्राचार्य गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख रक्कम व शील्ड देऊन गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून उत्सव घेण्यापाठीमागील उद्देश सांगितला. विभाग प्रमुख सौ. अर्चना कदम यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. संयोजिका कुमारी कोमल बाबर यांनी आभार मानले. सौ. रेश्मा मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. कोमल बाबर, सौ. पौर्णिमा गायकवाड, सौ. तेजश्री जमदाडे, सौ. प्रियंका पानसरे कु. श्रद्धा चौधरी, सौ. कोमल चौधरी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा विविध जिल्ह्यातून प्राध्यापक व दोनशेहून अधिक संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button