ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पनवेल :-तळोजा फेज 1 & 2 चें अंतर्गत रस्ते 7 दिवसात खडे मुक्त करणे संदर्भात कासमभाई मुलाणी यांनी दिलेल्या निवेदनाला यश

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

प्रती
मा. श्री. संजय मुखर्जी साहेब
एम डी सिडको कार्यालय,
सी बी डी बेलापुर, नवी मुंबई
मा. श्री. गणेश देशमुख साहेब
आयुक्त, पनवेल महानगरपालिका
मा. श्री. मिलिंद म्हात्रे साहेब
कार्यकारी अभियंता,
सीडको कार्यालय, सेक्टर 6,
कलंबोली, नवी मुंबई
मा. श्री. जितेंद्र सोनावने साहेब
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तळोजा पोलीस ठाणे, नवी मुंबई
विषय तळोजा फेज 1 येथील मुख्य रस्त्यावरील खड्डयांमध्ये उपोषण आंदोलन करणार असले बाबत
संदर्भ – तळोजा फेज 1 &2 चें आतरंगत रस्ते 7 दिवसात खडे मुक्त करणे संदर्भात
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरण आदरणीय महोदयाना कळविण्यात येते की तळोजा फेज 1&2 मध्ये
सर्वच रस्त्याची अक्षरशः चाळन झालेली असल्याने प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खडे पडलेले आहेत लवकरच गणेश उत्सवाचे आगमन होणार आहे तसेच सर्वच खड्यामध्ये पावसाचे पाणी भरून तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे, आशा स्थितीमध्ये नागरिकांना आपले वहान चालविताना बऱ्याच वेळा अंदाज न आल्याने अनेक अपघात झालेले आहेत खडे बुजविण्याकरिता सिडको अधिकारी याच्याशी संपर्क केला असता काही खड्डेच तात्पुरते भरले जातात त्यामुळे नागरिकांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अनेक नागरिकांना वाहनाचे नुकसान सोसावे लागून पाठीचे आजार जडले आहे खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा शोधण्याची नागरिकांच्या वर वेळ आलेली आहे याबाबत महोदयांनी योग्य तो निर्णय घेऊन येत्या 7 दिवसात तळोजा फेज 1&2 विभाग खड्डे मुक्त करण्याचे संबंधित विभागास आदेश देण्यात यावेत अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मुख्य रस्त्यावरील खड्डयांमध्ये बेमुदत उपोषण करण्यात येईल प्रसंगी कायदा व सुव्यवस्था बीगडल्यास त्यास सिडकोचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची आदरणीय महोदयांनी नोंद घ्यावी.

18/08/2022 रोजी हे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाचा परिणाम होऊन आज तारीख 21/08/2022 रोजी खड्डे मुजविण्याचे काम चालू झाले. त्याच्या सर्व श्रेय समाजसेवक कासमभाई मुलाणी यांना जाते, असे प्रतिपादन सर्व जनतेमधून होत आहे. समाजातील अडीअडचणीला धावून येणारी व्यक्ती का संभाजी मुलांनी असे संबोधले जाते. कासमभाई मुलानी यांच्या अथक प्रयत्नांनी आज रस्त्याचे काम चालू झाले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button