ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई :-ग्रामपंचायत मेनवली यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त ९ ऑगस्ट पासून विविध उपक्रम राबविण्यात आले.

संपादक:- प्रल्हाद चव्हाण:-8208717483

वाई :-ग्रामपंचायत मेनवली यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त ९ ऑगस्ट पासून विविध उपक्रम राबविण्यात आले.
आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी गावामध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण अतिशय उत्साहात पार पडले. तदनंतर ग्रामस्थ मंडळ व ग्रामपंचायत यांच्या वतीने मेणवली गावातील आजी-माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान व मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला सदर कार्यक्रमाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शीतल जानवे-खराडे तसेच ज्येष्ठ वक्ते व कादंबरीकार अॅड उमेश सणस श्री नितीन व सौ मेनवलीकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते प्रारंभी भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले जि.प. शाळा मेनवली या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक नृत्य सादर केले.
ग्रामपंचायत यांच्या वतीने सरपंच सौ लक्ष्मी वेदपाठक उपसरपंच संजय चौधरी मेनवली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मधुकर चौधरी नारायण चौधरी चंद्रकांत चौधरी नंदकुमार चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला तीनही दलातील आजी-माजी सैनिक पोलीस दलातील कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला सन्मान पत्राचे वाचन संजय चौधरी यांनी केले ग्रामपंचायत यांच्यावतीने मधुकर चौधरी यांनी मनोगत सादर केले श्री मेनवलीकर कुटुंबीयांच्या वतीने सहकार्याने सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या वतीने जि प प्राथमीक शाळा मेणवली सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्य वाटप करण्यात आले मूर्तीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल चौधरी यांनी ग्रामपंचायती व ग्रामस्थांचे आभार मानले उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शीतल जानवे खराडे मॅडम यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन बद्ध गौरव उद्गार काढले तसेच छान प्रकारे मार्गदर्शन सुद्धा केले
अॅडउमेश सनस यांनी देशाच्या स्वातंत्र पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळात झालेले बदल याविषयी माहिती दिली आजी माझी सैनिकांबद्दल गौरव उद्गार काढले आणि मेनवली गावामध्ये एवढे आजी-माजी सैनिक आहेत हे पाहून त्याबद्दल कौतुक सुद्धा केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील चौधरी सर यांनी केले आभार सौ लक्ष्मी वेदपाठक यांनी मांडले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य कृषी अधिकारी तलाठी मॅडम ग्रामसेवक पोलिस पाटील सर्व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास ग्रामपंचायत मेणवली समस्त ग्रामस्थ मंडळ मेणवली व स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button