वाई:-वाढदिवसाचा जल्लोष नाही, माणुसकीचा जागर! अजितदादांच्या स्मृती अन् शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी मकरंद आबांचा मोठा निर्णय!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वाढदिवसाचा जल्लोष नाही, माणुसकीचा जागर! अजितदादांच्या स्मृती अन् शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी मकरंद आबांचा मोठा निर्णय!

२९ ऑक्टोबरला सत्कार-हारतुरे टाळणार; वाढदिवसाच्या खर्चातून गरजूंना मदत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन.
सातारा | वाई, दि. २८ : एका बाजूला अजितदादांच्या आठवणींचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाच्या संकटात होरपळणारा बळीराजा! अशा संवेदनशील परिस्थितीत वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा दुःखात सापडलेल्या माणसाच्या पाठीशी उभे राहण्याला प्राधान्य देत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सत्कार, हारतुरे आणि अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन त्यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना केले आहे.
अजितदादांच्या आठवणी; मनात दुःख, कृतीतून श्रद्धांजली!
लोकनेते अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने मन व्यथित झाले असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटण्याची त्यांची वृत्ती आणि जनहिताची तळमळ कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांनी जपलेला लोकसेवेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
बळीराजा संकटात; उत्सवापेक्षा मदतीला महत्त्व!
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक संकटांमुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत. अशा वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च गरजूंच्या मदतीसाठी वापरला, तर त्यातून एखाद्या कुटुंबाला दिलासा मिळू शकतो. त्यामुळे दिखाऊ कार्यक्रमांऐवजी शेतकरी, गरजू नागरिक आणि संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्यावर भर द्यावा, असे आवाहन मकरंद आबांनी केले आहे.
हारतुरे नकोत, मदतीचा हात द्या!
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, हारतुरे आणि सत्कारांवर खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.
“वाढदिवसाचा खरा आनंद सत्कारात नाही, तर गरजू माणसाच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या समाधानात आहे,” या भावनेतून मकरंद आबा पाटील यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. अजितदादांच्या स्मृतींचा सन्मान आणि संकटग्रस्तांच्या वेदनांशी एकरूप होण्याचा हा निर्णय म्हणजे उत्सवापेक्षा माणुसकीला मोठे मानणारा संदेश ठरत आहे.




