आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
कर्जत:-भीमाशंकरच्या कुशीवर घाव; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा.
पत्रकार राधाजी व्यवहारे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कर्जत:-भीमाशंकरच्या कुशीवर घाव; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा.

भीमाशंकर अभयारण्यालगतच्या कर्जत पट्ट्यात गुजरातस्थित ‘टॉरेंट पॉवर’ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतच्या पोलीस ग्राऊंडवरील सभेतून केवळ सरकारवरच तोफ डागली नाही, तर स्थानिक गावकऱ्यांनाही धारेवर धरले.
“जर तुम्ही स्वतःच अन्यायाविरोधात थंड बसणार असाल, हात जोडून रडत बसणार असाल आणि निवडणुकीत १५०० रुपयांच्या लाडकी बहीण योजनेवर मत विकणार असाल, तर मी पुन्हा इकडे येणार नाही! तुमचं नेतृत्व करायची मला अजिबात गरज नाही,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केल*
“गुजरातचे दोन माणसं महाराजांचा महाराष्ट्र चालवणार का?” – राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर थेट निशाणा!
राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलेले १० टोकदार प्रश्न:
१. सह्याद्रीकडे बघून आज छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटत असेल? महाराजांच्या महाराष्ट्रात सह्याद्रीची अशी कत्तल कशी सहन केली जाते?
२. महाराष्ट्रातले खासदार आणि आमदार नेमके काय करत आहेत? आपल्याच भागातील जंगल लुटले जात असताना हे लोक गप्प का?
३. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी केंद्रातील नेत्यांसमोर इतके लाचार आणि हतबल का झाले आहेत?
४. केंद्रातील दोघांच्या इशाऱ्यावर आणि गुजरातमधील एका खासगी कंपनीसाठी महाराष्ट्राचा सह्याद्री का पोखरला जातोय?
५. आज जंगलांवर कुऱ्हाड चालतेय, उद्या हीच वेळ तुमच्या गावांवर आणि शहरांवर येणार नाही का?
६. गडचिरोलीचे जंगल तोडून खाणींना परवानगी दिली, मग आता सह्याद्रीची जंगलेही भांडवलदारांच्या घशात घालणार का?
७. प्रकल्पाला विरोध झाल्यास गावाची वीज बंद केली जाईल, अशा धमक्या देऊन स्थानिक जनतेची मुस्कटदाबी का केली जातेय?
८. सह्याद्रीच्या कुशीत तब्बल २३ मोठे प्रकल्प येत आहेत; या २३ पैकी फक्त ३ प्रकल्प केंद्राचे, मग उरलेले सर्व २० प्रकल्प खासगी उद्योगपतींच्या फायद्यासाठीच का?
९. ५० खोके म्हणजे ५० कोटी; मग शिवसेनेचे ४० आमदार फोडण्यासाठी लागलेले तब्बल २ हजार कोटी रुपये कुठून आले?
१०. स्थानिक आदिवासी आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावून निसर्गाचा बळी देणारा कसला हा विकास?




