कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-राजणगाव अंधारात, चोर उजेडात! 15 दिवसांपासून रात्रीची लाईट गायब – हे राजकीय षडयंत्र तर नाही ना?

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 पारनेर:-राजणगाव अंधारात, चोर उजेडात! 15 दिवसांपासून रात्रीची लाईट गायब – हे राजकीय षडयंत्र तर नाही ना?

पारनेर तालुक्यातील सुपा पंचक्रोशीतील राजणगाव परिसर गेली 15 दिवसांपासून अंधारात बुडाला आहे. रात्रीची लाईटच येत नाही. महावितरण नेमकं करतंय काय? हा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडात आहे.

लाईट नाही म्हणजे चोरांना मोकळं रान! गेल्या 15 दिवसात या परिसरात चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. शेतातील मोटार, केबल, जनावरं, घरातील साहित्य… चोर काहीही सोडत नाहीत. रात्री गावात स्मशान शांतता आणि चोरांची मिजास. पोलीस प्रशासनही हतबल झालंय, कारण अंधारात चोराला पकडणार कस,

दुष्काळ जाहीर होऊनही शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय. पिण्याला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, जनावरं कशी जगवायची याची चिंता. त्यातच आता रात्रीची लाईट नाही. जनावरांना पाणी पाजायचं कसं? शेताला पाणी द्यायचं कसं? शेतकरी रात्री जागून काढतोय, तरी चोरी थांबत नाही,

आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत या भागाचे आदरस्थान असलेले राहुल पाटील शिंदे यांचा पराभव झाला. निवडणूक संपली आणि लगेचच या भागाची लाईट गायब झाली. हा निव्वळ योगायोग आहे का? की पराभवाचा राग राजणगावकरांवर काढला जातोय? असा संशय आता गावकऱ्यांमधून व्यक्त होतोय.

महावितरणचे अधिकारी नेमके कोणाच्या सांगण्यावरून लाईट सोडत नाहीत? कुणाच्या इशाऱ्यावर हा अंधाराचं खेळ चाललाय? याचं उत्तर प्रशासनाने द्यायलाच हवं.

“आम्हाला राजकारण नको, आम्हाला लाईट पाहिजे. 15 दिवस झाले, आता सहन होत नाही. लाईट नाही दिली तर आम्ही महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करू,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

माहिती सेवा समितीचे पारनेर तालुकाध्यक्ष राजकुमार इकडे यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. “राजणगावला अंधारात ठेवून जर कुणाला राजकीय सूड उगवायचा असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. लाईट तात्काळ सुरु करा, चोऱ्या थांबवा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button