मुंबई:-वादळी वाऱ्याचा तडाखा : वरळी कोळीवाडा स्मशानभूमीचे पत्रे उडाले; सुदैवाने जीवितहानी टळली.
पत्रकार श्रीकृष्ण कोयंडे दादर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-वादळी वाऱ्याचा तडाखा : वरळी कोळीवाडा स्मशानभूमीचे पत्रे उडाले; सुदैवाने जीवितहानी टळली.

मुंबई | प्रतिनिधी | दि. ४ जुलै :
मुंबईतील वरळी कोळीवाडा येथील स्मशानभूमीला आज (दि. ४) सायंकाळी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे स्मशानभूमीवरील लोखंडी पत्र्यांचे छप्पर उडून गेले, तर लोखंडी संरचनेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. उडालेल्या पत्र्यांमुळे आणि लोखंडी साहित्यामुळे परिसरात धोका निर्माण झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
प्रत्यक्षदर्शी व स्थानिक रहिवासी भावेश कोळी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जोरदार वाऱ्यामुळे काही क्षणांतच संपूर्ण पत्र्याचे छप्पर उखडून उडाले आणि स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त भाग सुरक्षित करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




