ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर सुपा-निवडणुकांत मनसेचा झेंडा फडकवण्याचा नयन कदम यांचा निर्धार – सुपा येथे मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

निवडणुकांत मनसेचा झेंडा फडकवण्याचा नयन कदम यांचा निर्धार –  सुपा येथे मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठोस कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकवावा, असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहिल्या- नगर जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम साहेब यांनी व्यक्त केला पारनेर तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुपा येथे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांची रणनीती आणि सहकार क्षेत्रातील संधी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट करताना नयन कदम म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद वाढवणे सहकार क्षेत्रात कार्यकर्त्यांना प्राधान्य देणे तरुण व नव्या नेतृत्वाला संधी देण- गावपातळीवर संघटन विस्तार करून जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांना कदम यांनी दिली यावेळी बोलताना पवार म्हणाले स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडुन प्रशासनाला सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी निर्भीडपणे आवाज ऊठुन भाग पाडले जाईल आणि पारनेर तालुक्यात एक सक्षम विरोधी पक्ष ही मनसेची आगामी भूमिका असेल असे पारनेर तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी स्पष्ट केले यावेळी तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के यांची पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालकपदी निवड तसेच तालुका सचीव नारायण नरवडे यांची कडुस ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल संपर्क अध्यक्ष कदम यांनी त्यांचा सन्मान केला व अशाच प्रकारे निवडीमुळे मनसेला सहकार क्षेत्रासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बळकटी मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करताना कदम म्हणाले की, “पारनेर तालुका दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मनसे सक्षम उमेदवार उभे करेल. इच्छुक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन निवडणुका लढवाव्यात पक्ष संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”
बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.या बैठकीस जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे,पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, अक्षय सुर्यवंशी,बाबु भैय्या कोठावळे,सुरज गोरे,निकम गजरे, सतिश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button