आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-वारकरी संप्रदायातील निष्ठावंत काळाच्या पडद्याआड; ‘पांडुरंगाच्या चरणी विसावला विठ्ठल’

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वारकरी संप्रदायातील निष्ठावंत काळाच्या पडद्याआड; ‘पांडुरंगाच्या चरणी विसावला विठ्ठल’

वाई, दि. ०३ : नावेची वाडी, वाई (ता. वाई) येथील रहिवासी आणि पत्रकार श्री. प्रविण गाडे यांचे वडील श्री. विठ्ठल अंतू गाडे (वय ७३) यांचे शनिवार, दि. २ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका सात्विक, कष्टाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्वाला समाज मुकला आहे.
विठ्ठल गाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणा, प्रामाणिकपणा आणि परोपकाराच्या मार्गाने व्यतीत केले. कोणाशीही वाद न ठेवता सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावलेले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत पांडुरंगावरील त्यांची अढळ श्रद्धा आणि भजन-कीर्तनाची आवड ही त्यांच्या जीवनाची ओळख बनली होती.
व्यवसायाने गवंडी असलेल्या विठ्ठल गाडे यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर अनेकांची स्वप्नातील घरे उभी केली. मात्र, स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असतानाच काळाने त्यांना हिरावून नेले. अर्धवट राहिलेले ते स्वप्न आज कुटुंबीयांसाठी वेदनादायी ठरत आहे.
रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी वाई येथील रविवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. विठ्ठल गाडे यांचा सावडण्याचा विधी सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता रविवार पेठ, वाई येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती गाडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली… 💐🙏💐

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button