आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-स्त्री शिक्षणाची जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती फुले नगर (शहाबाग)येथे उत्साहात साजरी!

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

स्त्री शिक्षणाची जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती फुले नगर (शहाबाग)येथे उत्साहात साजरी!


सातारा वाई.३ जानेवारी.
ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती काळेश्वरी मंदिर, महात्मा फुले नगर , शहाबाग येथे साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा शाहबाग येथील विद्यार्थिनींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजी अण्णा जमदाडे त्याचबरोबर दिशा अकॅडमीचे सर्वेसर्वा डॉक्टर नितीन कदम सर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यानंतर जिल्हा परिषद शाळा शहाबाग येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित एकांकिका, नाटक तसेच गीत सादर केले.

यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी वाई नगर परिषदेचे माजी नगरसेवक महेंद्र तात्या जमदाडे, त्याचबरोबर उपस्थित सुदाम बापू जमदाडे आणि डॉक्टर नितीन कदम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते तसेच आयोजकांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आले. अंततः पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गीत सादरीकरण केले आणि त्यानंतर आभार मानून सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळा शहाबागच्या मुख्याध्यापिका सरिता पवार मॅडम, तसेच सुरेखा भुजबळ यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत शहाबाग चे विद्यमान सरपंच सागर जमदाडे ,सदस्य सुधीर जमदाडे, त्याचबरोबर सुनील ससाने , रंगाराव जमदाडे, प्रदीप जमदाडे, नंदकुमार जमदाडे, विजय जमदाडे, राजीव कुमार जमदाडे, हेमंत जमदाडे,अजित जमदाडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदित्य जमदाडे,शुभम सणस, शैलेश कुदळे, आशिष जमदाडे, सुरज भुजबळ, प्रणित मोरे, अथर्व धायगुडे , प्रतीक मोरे ,मयुर चव्हाण ,प्रणव जमदाडे आणि उपस्थित सहकाऱ्यांनी केले होते. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button