आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथे 28 डिसेंबर रोजी भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित !!!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

चंद्रपूर येथे 28 डिसेंबर रोजी भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित !!!

चंद्रपूर/भद्रावती – आधुनिक सत्यशोधक चळवळीचे प्रेरणास्थान ठरलेले पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सद्श्य समाजसेवक रघुनाथ ढोक यांचा 28 डिसेंबर 2025 रोजी तथागत बुद्धविहार नविन सुमठाना,भद्रावती,चंद्रपूर येथे भारतीय संविधान दिन व डॉ.आंबेडकर महापरिनिर्वाण दिनप्रित्यर्थ “भारतीय संविधान सन्मान” -राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 ने सकाळी 11 वाजता सन्मानपत्र आणि मोमेंटो शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सत्काराचे आयोजन संविधान सन्मान समरोह समिती सुमठाना ,भद्रावती चे वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.प्रविण चिमुरकर ,स्वागताध्यक्ष मा.मनोजभाऊ मोडक, मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक मधुकररावजी बावलकर (तेलंगाना),उद्घाटक म.रविंद्र चिवडे आणि प्रमुख उपस्थीत म्हणून ब्रीजभूषण पाझारे,अँड.पूनम वाघमारे/उमरे ,मा.सुरज गावंडे ,डॉ.अजय दहेगावंकर ,मा.प्रभाकर डोंगरेसर रहाणार आहेत.
सत्यशोधक रघुनाथ ढोक हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धा, मुहूर्त, कर्मकांड आणि जातीभेदापलीकडे जावून गेली अनेक वर्षे सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश तसेच जाती निर्मलून साठी जात विरहीत कामकाज विनामूल्य करीत आहेत. त्यांनी अनेक विवाहप्रसंगी वधू वर यांना व इतर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान कायम भेट देऊन ते नेहमी उद्देशिका वाचून कार्यक्रमाची सुरुवात करीत असतात. त्यांनी नुकतेच सांगली येथे उच्चशिक्षित चमार मधील वधू वर यांचे भारतींय संविधानाचा अमृत महोस्त्वी वर्षांनिमित दि.26.11.2024 रोजी 75 संविधान प्रती व राष्ट्रीय संत रोहिदास ग्रंथ भेट देऊन सत्यशोधक विवाह पार पाडला आहे. त्यांच्या या कार्यामुळे सत्यशोधक चळवळीला नवे बळ प्राप्त झाले आहे.
ढोक यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र व तेलंगणात एकूण 54 सत्यशोधक विवाह व 15 वास्तू / गृहप्रवेश विधी मोफत पार पाडले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत कार्यरत राहत त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले गीतचरित्र आदी महत्त्वपूर्ण पुस्तकेही वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केलेली असून ते लवकरच लोकांना सहज सोफे भाषेत संविधान समजावे म्हणून डॉ.प्रल्हाद वडगावकर लिखित भारताचे संविधान प्रकाशित करणार आहेत. पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लिपिक पदावर कार्यरत असूनही, त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड पेटत ठेवली आहे.
या पुरस्कारावेळी जेष्ठ समाजसेवक शिवदास महाजन (पुणे) आणि प्रा.सुकुमार पेटकुले(तेलंगाना) व इतर मान्यवरांचा देखील सन्मान केला जाणार आहे कार्यक्रमाचे आयोजक वामन दुर्योधन व समितीचे अध्यक्ष निलेश पाटील , सचिव आनंद भगत , गौरव शेळके , कोषाध्यक्ष भीमराव लोखंडे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button