ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा विकासाचा महासंकल्प वाई शहराचा कायापालट होणार का?

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा विकासाचा महासंकल्प वाई शहराचा कायापालट होणार का?

सातारा वाई.महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहराच्या वाई नगरपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून मतदारांनी परिवर्तनाला कौल दिला आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे मा. अनिल(भाऊसाहेब )सावंत यांनी २१५९ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठा सुरूंग लावला आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासहित १० जागांवर विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) बिन विरोध जागासहित १२जागांवर विजय पटकवुन सभागृहात आपले बहुमत राखले आहे एक जागा अपक्ष उमेदवाराच्या पदरात पडली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या समोर वाई शहराचा सर्वांगीक विकासाचे मोठे आव्हान आहे. प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर वाईकरांच्या नजरा खिळल्या आहेत. पायाभूत सुविधा दर्जेदार चांगल्या प्रकारचे रस्ते भुयारी गटारे आणि स्वच्छ पाणी पुरवठा , स्वच्छ स्वच्छालये, मुताऱ्या , दुर्गंधी कचरा मुक्त तसेच वाहन पार्किंगची सोय वारंवार ट्राफिक जामची होणारी समस्या यावर योग्य पद्धतीने नियंत्रण. या सारख्या मुलभूत गरजांकडे जास्त लक्ष देवून त्या पुर्ण करण्यावर भर देणे. कृष्णा नदी सांडपाणी मुक्त करून संवर्धन करणे नदी किनारी असणाऱ्या सर्व घाटांचे तसेच पौराणिक मंदिरांचे सुशोभीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्याऱ्या सोईसुविधा उपलब्ध करून पर्यटनासाठी वाई शहर सज्ज ठेवणे.
नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे असले तरी बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कडे असले तरी वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हितासाठी सर्व पक्षांना एकत्रितपणेच काम करावे लागणार आहे.सातार जिल्ह्याचे सुपुत्र मदत व पुनर्वसन मंत्री साहेब मकरंद (आंबा) पाटील यांनी ही नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. विजयी झाल्या नंतर भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. अनिल (भाऊसाहेब)सावंत यांनी वाई शहराच्या विकासासाठी आम्ही आपसी कोणतेही मतभेद न ठेवता वाई शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करणार व यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास वाई शहर वासीयांना दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे मा. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत.तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेब (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब (शिवसेना शिंदे गट) हे सातारा जिल्हाचे सुपुत्र आहेत त्या मुळे वाई शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार यात काही शंका नाही. मात्र आता लोक निर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक प्रतिनिधी हे किती वेगाने वाई शहराच्या विकासाकामांना सुरूवात करणार याकडे सर्व वाई करांचे लक्ष लागले आहे मात्र खरे काय ते येणाऱ्या काळातच पहावयास मिळेल हे मात्र नक्कीच आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button