वाईत हरवलेला मोबाइल सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने चव्हाण दांपत्याच्या ताब्यात!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाईत हरवलेला मोबाइल सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने चव्हाण दांपत्याच्या ताब्यात!

वाई:-जानेवारी 2025 : वाई गंगापुरी येथील शाहीर चौक ते नगरपालिका रस्ता परिसरात एक वन प्लस कंपनीचा अज्ञात मोबाईल पडलेला आढळला. ही माहिती वाईतील सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ थोपटे यांना मिळाली.
सुधीर भाऊ थोपटे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व अंमलदार प्रेमजीत शिर्के यांच्याशी संपर्क साधला आणि मोबाईल पोलिसांच्या ताब्यात सुपूर्त केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईलची ओळख पटवण्यात आली आणि तो चव्हाण दांपत्याच्या ताब्यात देण्यात आला.
चव्हाण दांपत्याने वाई पोलीस स्टेशन आणि सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ थोपटे यांचे उपकार आणि तत्परतेबद्दल आभार मानले. ही घटना स्थानिक समाजात सामाजिक जबाबदारी आणि पोलिस-सहकार्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करते.
सुधीर भाऊ थोपटे म्हणाले, “सर्वांनी एकमेकांच्या वस्तूंची काळजी घ्यावी आणि जबाबदारीने वागावे, यामध्येच समाजाची खरी शक्ती आहे.”




