वाई:-(कळंबे)- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना-माहिती व मार्गदर्शन शिबिर (महिला मेळावा).
पत्रकार अशितोष चव्हाण महासचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण महासचिव
RPS STAR NEWS
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना-माहिती व मार्गदर्शन शिबिर (महिला मेळावा.
ग्रामपंचायत कळंभे ता. वाई जि. सातारा यांचे वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माहिती व मार्गदर्शन शिबिर आज गुरुवार दिनांक-४/७/२०२४ रोजी शहिद शशिकांत शिवथरे सांस्कृतिक भवन कळंभे येथे आयोजित करण्यात आले होते . सदरील शिबिरामध्ये सदरली योजनेमध्ये पात्र- अपात्र निकष लाभार्थी याची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कृषी विभागाचे वतीने कृषी योजना,ई पीक पाहणी,पीक विमा यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले.सदरील प्रसंगी कळंभे गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ.निलम शिवथरे ,ग्रामसेवक प्रभुणे आण्णासो, तलाठी श्री पाटील साहेब,कृषी विभागाचे अधिकारी श्री. मोरे साहेब,श्री.यमगर साहेब, आदर्श सौ.ज्योती गायकवाड,माजी सरपंच सौ. सारिका गायकवाड, उपसरपंच श्री.आबाजी सुतार,भावी उपसरपंच सौ शकुंतला चव्हाण,अंगणवाडी सेविका सौ.दिपाली शिवथरे,सौ. दिपाली नलवडे, पोलीस पाटील सौ.जयश्री शिवथरे , कोतवाल सौ.भाग्यश्री वेदपाठक,आशाताई सौ.साधना गायकवाड, अंगणवाडी मदतनीस सौ.विद्या शिवथरे,सीआरपी सौ.नुतन बाबर,कृषीसखी सौ.उल्का शिवथरे,माजी सरपंच श्री. संभाजी गायकवाड,माजी उपसरपंच प्रकाश बाबर,श्री.शिवाजी सुतार, शिपाई श्री.दिलीप वाघ,सौ.माधुरी वाघ,आँपरेटर सौ.आश्वीनी वाघ, महिला बचत गटाच्या सर्व सदस्यां पदाधिकारी व कळंभे गावातील सर्व माता- भगिनी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
सदरील शिबिरास महिला व शेतकरी बांधवांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार व अभिनंदन करण्यात आले.
ग्रामपंचायत मौजे कळंभे ता वाई जि.सातारा