आरोग्य व शिक्षण

फलटण:-धन्यकुमार तारळकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

धन्यकुमार तारळकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.
फलटण :
जि. प. प्राथमिक शाळा मदनेनायकुडेवस्ती.
केंद्र -निंभोरे. ता.फलटण. जि. सातारा. येथे कार्यरत असणारे श्री.धन्यकुमार तारळकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार ,शालेय शिक्षण मंत्री मा दीपक केसरकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
धन्यकुमार तारळकर हे उच्च विभूषित असून या त्यांच्या अथांग ज्ञानाच्या जोरावर त्यांनी अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले.31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे
शिक्षक हे राष्ट्राचे खरे मार्गदर्शक, आधारस्तंभ. समाज आणि राष्ट्र यांच्या जडणघडणीत शिक्षकांच्या कार्याचा अतुलनीय वाटा असतो. ‘सुसंस्कृत माणूस घडवणे’हे शिक्षणाचे ध्येय आहे. तारळकर सर यांनी आपल्या शाळेत, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि आता राज्यात आपला ठसा उमटवला आहे. एकूण ३१ वर्षाच्या सेवा काळात त्यांनी ज्ञानदान,अद्यापनाबरोबर अनेक शैक्षणिक नवोपक्रम आणि वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, विज्ञान प्रदर्शन शिष्यवृत्ती मार्गदर्शन, यासारखे अनेक उपक्रम राबविले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण- कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण , त्याचबरोबर सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर , फलटण तालुका गटशिक्षणाधिकारी शाहीन पठाण , शिक्षण विस्तार अधिकारी .अनिल संकपाळ , जी.सी मठपती ,केंद्रप्रमुख बन्याबा पारसे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, पालक वर्ग, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button