पुणे पिंपरी:-राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे शहरात
महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर.
पिंपरी, दि. 21 (शफिक शेख):- आदरणीय लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन मध्ये खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्ष सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना वैयक्तिक आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावयास हवी. या शिबिरातील कॅन्सर तपासणी बाहेर करावयाची झाल्यास महिलांना जास्त पैसे मोजावे लागतात, परंतु शहर महिला कार्यकारिणीने समाजातील महिलांसाठी या तपासणी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारची तपासणी शिबिरे शहरात निरनिराळ्या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून दिला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
या अतिशय स्तुत्य उपक्रमाबद्दल महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट व त्यांच्या महिला कार्यकारिणीचे त्यांनी विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघिरे, वैशाली नागवडे, शितल हगवणे, मोहिनी ताई लांडे, नाना काटे, श्याम लांडे, राहुल भोसले, इमरान शेख, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, स्वाती काटे, उषाताई काळे, विश्रांती पाडाळे, सुरेखा लांडगे, अमिना पानसरे तसेच कविता खराडे, पुनम वाघ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे, संगीता कोकणे, ज्योती गोफणे आदी महिला कार्यकारणी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता आल्हाट यांनी, सूत्रसंचालन पुनम वाघ यांनी तर समारोप आभार कविता खराडे यांनी मानले.