औरंगाबादःबायकोच्या विरहातुन त्याने भावाला व्हिडीओ कॉल करत संपवली जीवन यात्रा.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादःबायकोच्या विरहातुन त्याने भावाला व्हिडीओ कॉल करत संपवली जीवन यात्रा मुकुंदवाडी शाहुनगर येथील वय 29 रिक्षा चालकाने मावस भावाला व्हिडीओ कॉल करत गळफास घेतला.ही घटना शनिवारी घडली.अमोल उत्तम खाडे का.शाहुनगर मुकुंदवाडी असे मयताचे नाव आहे.या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अमोल चे साडे तीन वर्षा पूर्वी लग्न झाले होते,त्याला अडीच वर्षा ची मुलगी असुन,पत्नी सहा महीन्यापासुन माहेरी आहे.अमोल राहत असलेल्या भाड्याच्या घरातुन शनिवारी ज्योतिनगर परीसरात राहणार्या मावस भावाला व्हिडीओ कॉल करून आपन आत्महत्या करत असल्याचे सागितले,किचन ओट्या जवळुन बोलत होता,तिथेच नायलॉन ची दोरी लटकलेली असुन हा फास गळ्यात अडकवल्याचे व्हिडीओ कॉल मध्ये रेकॉर्ड झाले आहे.अमोलला भावाने समजावण्याचा प्रयत्न केला,परंतु तो पर्यतं अमोल ने गळफास घेतला.नातेवाईकांनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्याला तपासुन मयत घोषित केले पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहे.नातेवाईकांच्या म्हनण्यानुसार पत्नी नादायला येत नसल्यामुळे अमोलने आत्महत्या केली असावी.