मेढा:-जावळीत भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
1)जावळीत भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा…

मेढा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे वारे वाहू लागलेले आहे. सातारा जावळी मतदारसंघांमध्ये महायुतीवर अंकुश ठेवण्यासाठी कदम कदम बढाये जा नारा देण्यात आला आहे. हे आता उघड झाली आहे.
सातारा जावळी तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय दृष्ट्या फार मोठी हालचाल झाली नाही. लोकप्रिय लोकप्रतिनिधी असलेल्या सब कुछ मंत्री शिवेंद्रसिंह राजे बाबा असे सातारा जावळी खोऱ्यात वातावरण निर्माण झाल्यानंतर खूप मोठी विरोधी पक्षाची पोकळी जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केला आहे. यापूर्वी अंकुश कदम यांनी नवी मुंबईत निवडणूक लढवून आपली ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नवी मुंबईतही शिवसेना नेते गणेश नाईक यांची अडचण दूर झाली आहे.
जावळी खोऱ्यातील मालचुंडी गावचे विद्या विभूषित असलेल्या युवा नेते अंकुश कदम यांना त्यांच्या कार्यास साजेस शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम विजयादशमी पूर्वीच नवी मुंबईत करून शिवसेनेचा धनुष्य बाण जावळी खोऱ्यात पुन्हा एकदा रणांगणात चालवण्याची शक्ती निर्माण केली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना आपले राजकीय वजन दाखवावे लागणार आहे. पूर्वी शिवसैनिकांना मॅनेज करून निवडणुकीच्या रणनीती मध्ये आपलेसे केले जात होते. आता शिवसेनेला इतरांवर अंकुश ठेवण्यामध्ये निश्चितच यश मिळणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून युवा नेते अंकुश कदम यांचा शिवसेना पक्ष प्रवेश फलोदायी ठरणार आहे. शिवसेनेच्या नावावर स्वतःच व्यक्तिमत्व उंचीपेक्षा मोठे करणाऱ्यांना चपराक बसणार आहे. असे ही भाकीत वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना या चार शब्दावरून निष्ठा असणाऱ्यांना आता लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.हे आता लपून राहिलेले नाही. मेढा नगरीत दही हंडी कार्यक्रम निमित्त युवा नेते अंकुश कदम यांनी अनेकांना व्यासपीठावर बोलवून त्यांची मानसिकता जाणून घेतली. दुसऱ्या फळीचे महायुती मधील कार्यकर्त्यांना संधी नसल्यामुळे त्यांना शिवसेनेने द्वार खुले केले आहे. अनेक काँग्रेस व राष्ट्रवादी मधील कार्यकर्ते हाती शिव धनुष्य घेण्यास तयारच आहेत. जावळी तालुक्यातील तापोळा ,केळघर ,कुडाळ, सायगाव, करहर परिसरात आजही शिवसैनिक आहेत. त्यांना एकत्र केले तर खऱ्या अर्थाने जावळीचा स्वाभिमान व जावळीच्या इतिहासात पुन्हा एकदा भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर एक हाती सत्ता आल्याने महायुतीलाही धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक व कार्यकर्ते निश्चितच अंकुश कदम यांना साथ देतील असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, नवी मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळेला सातारचे सुपुत्र विजय चौगुले, मंत्री उदय सामंत व जावळीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. जावळीचे सुपुत्र आ शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांच्यानंतर हा दुसरा युवा नेता शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या हाती आला आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जावळीमध्ये पुन्हा एकदा राजकीय कलिंगी तुरा दिसेल अशी चर्चा सुरू झालेली आहे.
____________________
फोटो – नवी मुंबई येथे जावळीचे सुपुत्र अंकुश कदम शिवसेना पक्षप्रवेशाच्या वेळी (छाया– अजित जगताप नवी मुंबई)
2)साताऱ्यात प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आंदोलकाची आई आंदोलन स्थळी…

सातारा दि: कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्यात मदत होते. परंतु, सातारा जिल्ह्यात आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रश्न प्रलंबितच राहत आहेत. आंदोलनामुळे काही आंदोलकाची परिस्थिती बिघडत आहे. याबाबत काळजी करणाऱ्या एका आई ने चक्क आंदोलन स्थळी जाऊन सर्व आंदोलक कार्यकर्त्यांची विचारपूस केली. या भावनिक भेटीने अनेक जण गहिवरून गेले आहेत.
याबाबत माहिती अशी की, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी वाढे तालुका जिल्हा सातारा येथील गट क्रमांक ६३ नंबर ३ येथील गॅस स्टेशन परवानगी बाबत प्रशासनाने माहिती द्यावी व उपाययोजना करावी. यासाठी पाच दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे अनेकांचे लक्ष आहे, ज्यांनी कर्तव्यदक्षतेने लक्ष द्यावे असे जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस यंत्रणा व पुरवठा विभाग यापैकी कोणीही त्याबाबत मोठा दबाव असल्यामुळे लक्ष देत नाही. अशी परिस्थिती अनेक आंदोलनाची होत असते.
काल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी गर्दी झाली होती.सोमवारी दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी श्रीमती रोहिणी अनिल उबाळे यांनी भेट दिली. आंदोलनासाठी बसलेले त्यांचे चिरंजीव श्री रमेश अनिल उबाळे व इतर आंदोलकांच्या तब्येतीची ही विचारपूस केली. जिल्हा प्रशासन जोपर्यंत न्याय देत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे आंदोलकांचे पालक सुद्धा यामध्ये सामील झाले.
सदरची घटना सातारा जिल्ह्यात प्रथमच घडल्यामुळे जिल्हा प्रशासनाने माणुसकी म्हणून या प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे. यावेळी आंदोलन करते रमेश अनिल उबाळे, महेश रणदिवे, पांडुरंग बल्लाळ, बाबुराव चव्हाण, रियाज मुलानी व सुनिता आवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
______________________
फोटो – आंदोलन मुलाच्या प्रकृतीच्या विचारपूस साठी आई आली धावून (छाया-निनाद जगताप, सातारा)




