ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-शहीद मयूर यादव यांच्या नातेवाईकांचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले सांत्वन.

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717453

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

शहीद मयूर यादव यांच्या नातेवाईकांचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले सांत्वन

वडूज दि: आंबला, पंजाब या ठिकाणी अपघात झालेल्या शहीद मयूर यादव यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी शोकाकुल वातावरणात वडूज या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले .
काल दुपारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शेत यादव यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपदी कामाचा आ. चव्हाण यांना अनुभव असल्यामुळे सेनादलातील अनेक बाबींबाबत त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी या वेळेला मार्गदर्शन केले. या भेटीच्या वेळीला शहीद मयूर यादव यांचे वडील जयंत यादव, आई सौ मंगल यादव, मयूर यादव यांची पत्नी श्रीमती राधिका यादव, बंधू हर्षद यादव व तीन वर्षाची चिमुकली अद्वेता या वेळेला उपस्थित होते.
झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी मनोकामना श्री चव्हाण यांनी केली. तसेच जे काही सेनादलाबाबत लागणारे जे सहकार्य आहे. ते मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. असे स्पष्ट केले. या वेळेला राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजीत भैय्या देशमुख व खटाव तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे अशोक आबा गोडसे, डॉ. महेश गुरव, इम्रान बागवान, राहुल सजगणे, आबासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा संघटक सुधाकर शिलवंत ,नरेश देसाई व यादव कुटुंबियातील सदस्य तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. झालेल्या घटनेबाबत पंजाब येथील लष्करी सेनादलातील नाईक भिसे व कुलकर्णी यांनी घडलेल्या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना सविस्तर माहिती दिली. दरम्यान, काल वडूज नगरीत शोकाकुल मित्र परिवार आणि नातेवाईक, ग्रामस्थ अशा महत्वाच्या मोजक्या लोकांच्या उपस्थित सावडण्याचा विधी पार पडला.
————&———————————————–
फोटो – शहीद मयूर यादव यांच्या नातेवाईक यांची भेट घेताना माजी मुख्यमंत्री चव्हाण (छाया – सूरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button