वाई :- धोम कॉलनी येथील गटारी अजूनही उघड्या अवस्थेत – सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात, वाई नगर परिषदेचे दुर्लक्ष.
प्रतिनिधी डॉ पंकज पिसाळ सातारा :-7709034150.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
प्रतिनिधी डॉ पंकज पिसाळ सातारा :-7709034150.
वाई :- धोम कॉलनी येथील गटारी अजूनही उघड्या अवस्थेत – सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात.
धोम कॉलनी येथील रेस्ट हाऊस रोड वर अजूनही गटार उघड्या अवस्थेत आहेत .नवीन ड्रेनेज लाईन चे काम पूर्ण होवून कित्येक महिने झाले परंतु शेजारील गटार बंद करून नवीन ड्रेनेज लाईन ला जोडले नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून भरपूर प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. एकीकडे डेंग्यूची साथ पसरून लोक आजारी पडत आहेत आणि प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नुकताच बारामतीमध्ये एका महिला पोलिसाचा डेंग्यू मुळे दुर्दैवी मृत्यू झाला. अशा घटना आपल्याकडे होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? कितीतरी लोक,लहान मुले डेंग्यू मुळे आजारी पडत आहेत. वर्षातून कधीतरी फवारणी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर प्रशासन भर देणार का? तसेच, सायली हॉटेल जवळ उघड्यावर पडलेला कचरा उचलून वारंवार कचरा टाकणाऱ्या लोकांवर प्रशासन कारवाई करणार का? “स्वच्छ वाई, सुंदर वाई ” खरोखर अंमलात आणणार का? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. वाई नगरपरिषदीने तातडीने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.