आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शन गर्दीसाठी आयोजकांचे शाळांना साकडे.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शन गर्दीसाठी आयोजकांचे शाळांना साकडे.

 

फलटण प्रतिनीधी:- अवघ्या तालुक्यात शायनिंग महाराष्ट्र या प्रदर्शनाचा बोलबाला झाला असला तरी प्रदर्शनाची हवाच निघाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून नागरिकांनी या प्रदर्शनाकडे पूर्ण पाठ फिरवल्याचे आयोजकांच्या लक्षात येताच आयोजकांनी आता प्रदर्शन स्थळावर येण्याचे व गर्दी करण्यासाठीचे साकडे तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना घातल्याने प्रदर्शन स्थळावर फक्त विद्यार्थी दिसत असल्याचे आजचे चित्र आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत दिल्लीतील सांसा फाउंडेशनच्यावतीने फलटण येथील शुभारंभ लॉन्समध्ये शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळा सोडला तर दिवसभर प्रदर्शन स्थळावर शून्य टक्के नागरिकांच्या प्रतिसादाचे चित्र होते. आयोजकांनी याची धास्ती घेऊनच प्रदर्शन स्थळावर गर्दी करण्यासाठी स्थानिक शाळांच्या शाळा प्रमुखांना व विद्यार्थ्यांना खाजगी बसची सोय करून आमंत्रित करण्यात आले होते.

या प्रदर्शनाच्या एकूण पार्श्वभूमीवर सांसा फाउंडेशनचे प्रमुख एम.एम.भास्कर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून विचारले असता ते म्हणाले, या प्रदर्शनात केंद्र स्तरावरील एकूण ३५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गतवर्षापेक्षा यावर्षी आयोजित शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनास अल्प प्रतिसाद असून सध्या शाळांचे विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देत असल्यामुळे कालच्यापेक्षा आजचे वातावरण गर्दीचे वाटत आहे.

एकीकडे सामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला पाठ फिरवली असताना दुसरीकडे शाळेतील मुलांना बोलवून घेतले जात असल्याने या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भासवले जात आहे. ढसाळ नियोजन व प्रसिध्दी ची कमतरता केंद्र सरकारच्या लाखो रुपयांची नासाडी होत असून सामान्य नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button