सातारा:-सातारा जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे निर्विवाद वर्चस्व.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेवर वरद विनायक पॅनलचे निर्विवाद वर्चस्व.
सातारा दि: सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकारी सहाय्य संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत वरद विनायक पॅनलने १५ जागा जिंकून अष्टविनायक पॅनलचे विसर्जन करण्यात यश मिळवले. दरम्यान, या विजयामध्ये खटावचे तुकाराम खाडे यांना सर्वाधिक मते मिळाल्यामुळे चेअरमन पदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या या आर्थिक संस्थेसाठी दोन पॅनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितली होती. त्यानंतर रविवारी मतदान झाले व लगेच मतमोजणी घेण्यात आली.६२६ मतदारांपैकी५८८ मतदार बंधूंनी मतदान केले. यामध्ये किरण पाटणे, सुनील कापसे, श्रीरंग गोडसे, राकेश जाधव, प्रशांत पवार, प्रशांत भोईटे, सुनील भोसले, प्रशांत साळुंखे, संग्राम सिंह साळुंखे, सागर साळुंखे, महिला राखीव मतदारसंघातून हेमलता ग्रामोपाध्याय, राखी घोरपडे विमुक्त जमातीमधून तुकाराम खाडे, अनुसूचित जाती जमाती म्हणून अविनाश कवळे, इतर मागासवर्गीय मधून अरुण गुरव हे विजयी झाले. विद्यमान चेअरमन सागर साळुंखे यांनी विजयाचा चौकारा मारला आहे. सरासरी २४ ते ९० मताधिक्याने हे उमेदवार विजयी झाले असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्ता मोहिते यांनी काम पाहिले. वरद विनायक पॅनलचे सागर साळुंखे, अमोल पवार ,दिनकर चव्हाण, सुनील खामकर, मारुती जाधव, रामचंद्र सकपाळ यांनी मोठ्या जिद्दीने प्रचार मोहीम राबवताना कुठे ही अतिरेकपणा केलेला नाही. अत्यंत शांततेने मतदारांपर्यंत आपली भूमिका समजून सांगितली. त्यामुळे हे यश मिळाले आहे. निकालानंतर वरद विनायक पॅनलच्या सर्व संचालकांनी युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी केली.
खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी संचालक तुकाराम खाडे मित्रमंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून श्री. खाडे यांचा सत्कार केला तसेच त्यांना चेअरमन करून दुष्काळी माण खटाव तालुक्याला संधी द्यावी. अशी मागणी करण्यात आली.
या वेळेला नानासाहेब खाडे, परेश जाधव, आकाश जाधव, लालासाहेब माने, नितीन राऊत, डॉ विनोद खाडे, दत्ता इनामदार, हणमंत घाडगे, धनंजय चव्हाण, विजय खाडे, अजित जगताप, गणेश भोसले, सौ रीना जावळे, सौ गमरे, सौ जगदाळे, राजू फडतरे, विजय शिंदे, रामभाऊ जाधव, विजय शेटे, शहाजी खाडे, गणपत खाडे, प्रताप जगदाळे, संतोष दोरके तसेच प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने श्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले.
___________________________
फोटो -खटाव पंचायत समितीच्या आवारात नूतन संचालक श्री तुकाराम खाडे यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- सुरज पोतदार, वडूज)