आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-श्रीमती बाईनाबाई गायकवाड यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

निधन वार्ता –

श्रीमती बाईनाबाई गायकवाड यांचे निधन.
सातारा दि: नांदवळ ता. कोरेगाव जिल्हा सातारा येथील श्रीमती बाईनाबाई बुवाजी गायकवाड वय -७२ यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सायगाव ता. जावली हे त्यांचे माहेर होते. आपल्या बंधूंनी उच्च पदस्थ अधिकारी व्हावे. यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट घेतले होते. त्यामुळेच त्यांचे बंधू यशस्वी अधिकारी बनले होते.श्रीमती बायनाबाई या भीम गीतांच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होत होत्या. तसेच त्यांना आंबेडकरी चळवळीतील अनेक घडामोडी याची माहिती होती. भीम गीताच्या गाण्यामुळे त्यांनी अनेक गावात कार्यक्रम केले होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सूना ,नातवंड, विवाहित मुली- जावई असा मोठा परिवार आहे. दलित सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप- सायगावकर यांच्या त्या आत्या होत. रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी नांदवळ ता कोरेगाव या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता बौद्ध पद्धतीने त्यांच्या जलदान विधी व शोक सभा होणार असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र मनोहर व सतीश गायकवाड यांनी दिली आहे.

—————————————————————
फोटो – श्रीमती बायनाबाई गायकवाड, नांदवळ

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button