ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव माण ला टेंबुचे पाणी मिळवून denarch- डॉ. दिलीपराव येळगावकर

प्रतिनिधि:- दिलिप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख

खटाव माण ला टेंभूचे पाणी मिळवून देणारच_____डॉक्टर दिलीपराव येळगावकर मायनी प्रतिनिधी___खटाव माण चे हक्काचे पाणी आपण मिळवून देणारच अशी ग्वाही माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिली मायनी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते दरम्यान डॉक्टर दिलीप येळगावकर यांना ग्रामपंचायत मार्फत मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रियंका शिंदे धैर्यशील कदम माजी सभापती मानसी साळवी महेश पाटील सरपंच सचिन गुदगे उपसरपंच जगन्नाथ भिसे आनंदराव शेवाळे सुरज पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन मोहन दगडे जालिंदर माळी नितीन झोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती येळगावकर म्हणाले येथील धरणात पाणी आणताना कोर्ट आयोगाची झगडावे लागले खटाव माण तालुक्यातील जनतेला जिहे कटापूर योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहोत सरकार कोणाचेही असो पाणी मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही ाणीप्रश्‍नासाठी अनेक वेळा तुरुंगात गेलो स्वतःच्या सरकारविरुद्ध भांडलो यापुर्वी शंभर टीएमसी पाणी एक हजार फूट खाली एक हजार फूट खाली बोगद्यातून जाणार होते ते पाणी थांबवण्यासाठी मी कोर्टातून स्टे घेतला त्याला विरोध केला प्रभाकर घार्गे म्हणाले की येळगावकर यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे पाणीप्रश्‍नासाठी ते सतत कार्यशील असतात आम्ही सर्व एकत्र येऊन खटाव माण तालुक्यासाठी काम करणार आहोत सुप्रिया ताई शिंदे म्हणाल्या दिलीप येळगावकर यांचे नेतृत्व संघर्षातून तयार झाले आहे पाणी मिळवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे धैर्यशील कदम, डॉक्टर संदीप पोळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले शंभूराजे देसाई आमदार गिरीश महाजन रणजित देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संजीव साळुंखे यांनी डॉक्टर येळगावकर यांना शुभेच्छा दिल्या तसेच खटाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले व्यवस्थापन राजू कचरे यांनी केले अनिल भाऊ भोसले यांनी आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button