क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-जावली व आंदरूड गावचे पोलीस पाटलांची दमदार कामगिरी ग्राम सुरक्षा दलाचे मदतीने पकडले दोन सराईत गुन्हेगार.

प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

जावली व आंदरूड गावचे पोलीस पाटलांची दमदार कामगिरी ग्राम सुरक्षा दलाचे मदतीने पकडले दोन सराईत गुन्हेगार.

प्रतिनिधी शुभम भापकर
फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २३/९/२०२२ रोजी दुपारी ०२.३० वा.चे . सुमारास आंदरुड गावच्या हद्दीत फिर्यादी भुपेष जनार्दन साह मूळ रा. बनियाडीह गोड्डा बेनिअदी राज्य झारखंड हल्ली रा. स्वागत लॉज फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा हे फिरते कपडे विक्री करून परत फलटण येथे येण्यासाठी केसरकर वस्ती फाटा येथे थांबले असताना सराईत गुन्हेगार १) सागर शिवा काळे राहणार वडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा २) सनी चरण शिंदे उर्फ पवार राहणार इंदिरानगर झोपडपट्टी तासगाव जिल्हा सांगली हे त्यांच्या ताब्यातील युनिकॉर्न मोटरसायकल नंबर एम एच-११-डीसी-४६५६ वरून येऊन फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचे उजवे हाताचे अंगठ्यावर प्राण घातक हत्यार चाकू मारून जखमी केले व फिर्यादी कडून ३०,०००/- रोख रक्कम व ड्रेस मटेरियल ५०,०००/- रुपये किमतीचे जबरदस्तीने चोरून नेले होते त्यावेळी फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यावर त्या ठिकाणी आलेले आंदरूड गावचे पोलीस पाटील हनुमंत हरीचंद्र हरीहर यांनी लगेच जावली पोलीस पाटील भरतराव विठ्ठलराव मोरे यांना फोन करून दोन सराईत आरोपी हे जावली बाजूकडे येत असल्याचे सांगितले त्यावेळी जावली गावचे पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे लोक व पाठीमागून येणारे आंदरूड गावचे पोलीस पाटील व फिर्यादी यांचे मदतीने सराईत गुन्हेगारांना जावली येथील एका हॉटेल जवळ जीवाची परवा न करता पकडले व त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे कळविले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.
सदर सराईत गुन्हेगार यांच्यावर लोणंद पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वडगाव पोलीस स्टेशन सातारा पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने सराईत गुन्हेगारास पकडल्यामुळे आंदरुड गावचे पोलीस पाटील हनुमंत हरीचंद्र हरीहर व जावली पोलीस पाटील भरतराव विठ्ठलराव मोरे यांचा पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी पोलीस ठाणे येथे बोलावून सत्कार केला आहे व इतर पोलीस पाटील यांनी देखील अशाच प्रकारची आदर्शवत कामगिरी करावी याकरता सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे दर महिन्याला बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ हा पुरस्कार दिला जातो तसेच अशी विशिष्ट कामगिरी करणारे यांचा देखील वेगळा सत्कार २६ जानेवारी १५ ऑगस्ट व १ मे रोजी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.
सदरची कामगिरी केल्याबद्दल मा. अजय कुमार बंसल सो पोलीस अधीक्षक,मा. अजित बो-हाडे सो, अप्पर पोलीस अधीक्षक, मा. तानाजी बरडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी देखील पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button