पुणे:-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेतर्फे भव्य मार्गदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा.
प्रतिनिधी रफिक शेख पुणे :-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेतर्फे
भव्य मार्गदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा.
पुणे, दि. 19 (रफिक शेख ) :- पुणे येथील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेतर्फे भव्य मार्गदर्शन व पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातिमानगर, वानवडी येथे संपन्न करण्यात आला.
यावेळी कैलास पठारे राष्ट्रीय अध्यक्ष-पोलिस मित्र, सलिमभाई बागवान फेथ मशिनरी स्टोअर्स, डाॅ. अविनाश सुकूंडे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, रमेश राठोड, धनंजय ढवळे, अॅॅड. कचरेसर, रशिद पठाण, मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, उस्मानशेठ तांबोळी, मल्टी जिनियसचे एम. डी. फिरोज शेख, अशरफ इनामदार, अमन शेख, मेहबूब मुल्ला, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2022, आयकॉन महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार 2022, एशिया आयकॉन पुरस्कार 2022, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने तब्बल तेवीस जणांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख आणि पल्लवी पाटील व उस्मानशेठ तांबोळी याना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर रमेश राठोड, सलिम बागवान, मोनी ललितेश विजयजी, राजेंद्र सामोरे, डॉ. प्रमिला तवाकर, वसुधा नाईक, रेश्मा पाचारण, दत्तात्रय बनसीन, आदेश चव्हाण, रोहिणी भोसले, प्रथमेश बेलदरे, अॅॅड. शनिश्वर शिंदारे, नुरूल्ला शेख, दिनेश राठोड, रोहिणी देशमुख, पंचशिला कुडवे, मोनिशा घोरपडे, डॉ. राहुल शर्मा, डॉ. पायल गायकवाड, यांना महाराष्ट्र रत्न, आयकॉन महाराष्ट्र आणि एशिया आयकॉन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी पारितोषिक घेणार्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष सुकूंडे यांनी एकमेकांना बरोबर घेऊन काम केल्याने ताकद वाढत असल्याचा मोलाचा सल्ला दिला. सलिमभाई बागवान फेथ मशिनरी स्टोअर्सच्या वेगवेगळ्या ठिकाणी फ्रांचायशी देऊन गरीबांना घरच्या घरी काम करुन एक लाख रुपये कमवायचे मार्गदर्शनपर सांगितले.
मल्टी जिनियसचे एम. डी. फिरोज शेख यांनी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आपले करीयर घडविण्याचा मोलाचा सल्ला दिला. तसेच सामाजिक कार्याचा वसा त्यांच्या घरातूनच मिळाला असून ती परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवल्याचे सांगितले आणि तीन वर्षांपूर्वी परदेशातील ऑपरेशन्स मॅनेजर हा जाॅब सोडून आपल्या देशात येऊन जनहिताच्या माध्यमातून लोकांचे करीयर घडविण्याचे काम सुरू केले. ते महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन मोफत करिअर मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी 3 वर्षांत 240 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत.या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास पठारे यांनी केले तर आभार मानण्याचा कार्यक्रम अविनाश सुकूंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश राठोड यांनी केले.