ताज्या घडामोडी

फलटण:-आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य नूतन कार्यकारणी जाहीर – सौ.जयश्री तांबे

पत्रकार अशितोष चव्हाण 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अशितोष चव्हाण

RPS STAR NEWS

आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य नूतन कार्यकारणी जाहीर – सौ. जयश्री तांबे

 

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना सोशल मीडियाच्या युगात अनेक विद्यार्थी हे वाचनापासून दूर गेलेले दिसून येतात.शालेय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची प्रेरणा मिळावी, वाचनातून विद्यार्थ्यांमध्ये विचारांची प्रगल्भता यावी या उद्देशाने आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर ने वाचन प्रेरणा समूह, महाराष्ट्र राज्य स्थापना केलेली असून या समूहावरती अनेक विद्यार्थ्यांनी असंख्य पुस्तकांचे वाचन करून लेखन पाठवलेले आहे.

आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामध्ये मार्गदर्शक म्हणून उत्कृष्ट लेखक सुनील शेडगे, रवींद्र लटिंगे ,लक्ष्मण जगताप, उद्धव पवार ,धन्यकुमार तारळकर,तर जयश्री तांबे- अध्यक्ष, रंजना सानप – उपाध्यक्ष, मनीषा शिरटावले- कार्याध्यक्ष, अनुपमा दाभाडे – सचिव,अनिता जाधव- सहसचिव तसेच विभागीय उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र बोबडे,अमोल चवरे ,नवनाथ कोलवडकर, सचिन गोसावी, सुनील तिवाटणे यांची निवड करण्यात आली आहे.

सन 2017 पासून आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर हे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम साजरे करत आहे. गेली अनेक वर्ष आई प्रतिष्ठान वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे वाचन चळवळ राबवत असून आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत ३२०० हून अधिक पुस्तके विविध उपक्रमाद्वारे वाटप करण्यात आलेली आहेत. पुस्तक वाचल्याने चांगले विचार व चांगले संस्कार घडत असतात. शालेय विद्यार्थ्यांसाठी आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य विद्यार्थ्यांना वाचण्याची प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला असून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील.

1) इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त ३१ पुस्तकाचे वाचन करायचे आहे.

2)इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थ्यांनी ४१ पुस्तकाचे वाचन करायचे आहेत.

3)इयत्ता अकरावी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांनी ५१ पुस्तकाचे वाचन करावयाचे आहे.

वरील तिन्ही गटातील विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा अभिप्राय म्हणजेच ते पुस्तक आपल्याला कसे वाटले ते 25 ते 50 ओळीत फुलस्केप कागदावर स्व:अक्षरात लिहावयाचे आहे. (टाईप करावयाचे नाही).वाचनासाठी पुस्तके निवडताना प्रेरणादायी पुस्तके निवडावीत. (इयत्ता १ली ते ३ री च्या विद्यार्थ्यांना नियमात शिथिलता राहील.) पुस्तक वाचल्यानंतर अभिप्राय लिहीत असताना प्रथमतः आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य असा उल्लेख असावा. त्यानंतर पुस्तक क्रमांक, पुस्तकाच्या पहिल्या पानाचा फोटो,,पुस्तकाचे नाव,पुस्तकाचे लेखक, पुस्तकांच्या पानांची संख्या,पुस्तकाची किंमत व स्वतःचे नाव, शाळेचे नाव ,इयत्ता हे सर्व स्व:अक्षरात लिहून फेसबुक वरती फेसबुक पेज आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्य यावर पोस्ट करावे.

( विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती नातेवाईक ,मित्र, शिक्षक यांच्या फेसबुक अकाऊंट वरुन पोस्ट पाठवावी)

जे विद्यार्थी वरील अटी व नियम पूर्ण करतील अशा विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन प्रमुख पदाधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, पुस्तक, पेन इ. असते. आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.
अशी माहिती आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा समूह महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षा सौ.जयश्री तांबे सर यांनी दिली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button