धामोरी बुद्रुक सोसायटीचे अध्यक्षपदी दत्तात्रेय दुधाट तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब माने.
प्रतिनिधी :- कोंडीराम नेहे अहमदनगर 75074 69042

लोहगाव (वार्ताहर) : राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय रामभाऊ दुधाट यांची तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब गोविंद माने यांची बिनविरोध निवड झाली आहे.
धामोरी बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटी नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती जे.जी. हराळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. या बैठकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय दुधाट तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीस बाळासाहेब उगले, मच्छिंद्र पठारे, राजेंद्र उगले, रघुनाथ कुसमुडे, नामदेव कुसमुडे, पंढरीनाथ बाचकर, भास्कर गोवर्धन जाधव, अशोक पटारे, रामदास माने, मनीषा माने, छाया उगले व सचिव बाळासाहेब कुसमुडे हे उपस्थित होते.
याप्रसंगी नूतन पदाधिकारी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक बकरे, भानुदास बाचकर, चांगदेव पटारे, बाळासाहेब दुधाट, रघुनाथ उगले, बाळासाहेब माने, तबाजी बाचकर, भास्कर माने, विष्णू माने, ज्ञानदेव पटारे, मिनीनाथ पटारे, दिलीप पटारे, सुदाम उगले, सुदाम जाधव, लक्ष्मण जाधव, गोरख सोनवणे, सोपान विघे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे माजी मंत्री व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी जिल्हा परिषद सदस्य व अर्थ व बांधकाम समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.